2,25,000 मुला-मुलींना टोचणार कोविड-19 प्रतिबंधात्मक लस
कोविड चाचणी

2,25,000 मुला-मुलींना टोचणार कोविड-19 प्रतिबंधात्मक लस

आजपासून तालुकास्तर14 उपकेंद्रांवर लसीकरणास होणार प्रारंभ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील सव्वादोन लाख मुला-मुलींना (boys and girls) आता कोविड-19 प्रतिबंधात्मक लस (Covid-19 preventive vaccine) देण्यात येणार असून या लसीकरणाला दि. 3 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यात 15 वर्षांवरील एकूण 2 लाख 25 हजार मुला-मुलींची पात्र संख्या आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहरात छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर, डी.बी.जैन हॉस्पिटल शिवाजीनगर, कांताई नेत्रालय निमखेडीरोड आणि चेतनदास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी,जळगाव या चार केंद्रांवर तर 14 तालुकास्तरावर एक स्वतंत्र लसीकरण केंद्र (Vaccination Center) उभारण्यात आले असून प्रत्येकी एक असे 14 केंद्र चालू ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर पहिल्या दिवशी दि. 3 जानेवारी रोजी 500 लाभार्थींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान,सध्या कोव्हॅक्सिन (Covacin) आणि कोविशिल्ड (Covishield) दोन्ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाला जानेवारी 2021 मध्ये सुरूवात झाली. त्यावेळी सर्वप्रथम कोविड काळात कर्तव्य बजावणार्‍या फ्रन्टलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. त्यानंतर 60 वर्षांवरील वयोवृद्धांना लस देण्यात आली. टप्प्या टप्प्याने 45, 18 वर्ष वयोगटाला लस देण्यात सुरूवात झाली. मध्यंतरी कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लस टोचून घेण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. परिणामी, जिल्हा प्रशासनाला लसीकरणाची गती वाढविण्याकरिता मोठी कसरत करण्याची वेळ आली होती. तरीसुद्धा लसीकरणाची गती वाढच शकली नाही. शेवटी गरजूंना लस मिळावी,या उद्देशाने काही तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.असे असताना आता कोविड-19 चा ओमायक्रॉन ह्या नव्या व्हेरीयंटने दहशत पसरवली आहे. आता लसीकरणाशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही.

त्यामुळे केंद्र शासनाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवकांना लस देण्यास हिरवी झेंडी दाखविली आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात दि.3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील 2 लाख 25 हजार मुला-मुलींना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव शहरात 4 केंद्रात लसीकरण चालू ठेवण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागात 14 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रावर केवळ 15 वर्षावरील मुला-मुलींना लस घेता येणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन व ऑपलाईन नोंदणी 50 टक्केची व्यवस्था त्या-त्या केंद्रावर करण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणीसाठी साईट हॅक होण्याची शक्यता खूप कमी आहे. विशेष म्हणजे 18 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी सध्याच्या केंद्रांवरच लसीकरण करून घेता येणार आहे. अशा नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शाळा, महाविद्यालयात घेणार लसीकरण शिबिर

कोविड-19 प्रतिबंधात्मक लस 15 वर्षावरील मुला-मुलींना 3 जानेवारीपासून देण्यास सुरूवात होईल, असे शासनस्तरावरून अवगत करण्यात आले होते. मुला-मुलींची माहिती गोळा करण्यात आली असून 2 लाख 25 हजार जण असल्याची माहिती आहे. तरीसुद्धा शाळा, महाविद्यालयातील एकूण आकडेवारीनुसार लसीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. दरम्यान, 3 जानेवारी रोजी होणार्‍या लसीकरणासाठी 70 टक्के नोंदणी झाल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे.

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड

दोन्ही लस उपलब्ध

लसीकरणाच्या सुरूवातीला लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. आता मात्र, मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोसेस उपलब्ध आहेत. येत्या काळात आणखी व्हॅक्सिन उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

जळगावात 4 जानेवारीपासून लसीकरणास होणार सुरुवात

शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर, डी.बी.जैन हॉस्पिटल शिवाजीनगर, कांताई नेत्रालय निमखेडीरोड आणि चेतनदास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी,जळगाव या चार केंद्रांवर दि.4 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. 50 टक्के ऑनलाईन व 50 टक्के ऑपलाईन लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

Related Stories

No stories found.