विमा कंपनीची करणार लोकपालकडे तक्रार!

विमा इन्शुरन्स
विमा इन्शुरन्स

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विमा कंपनीने (insurance company) ग.स.सोसायटीसोबत (G.s.Society) केलेला करार कोणतेही ठोस कारण न देता दोन महिन्यातच करार (Agreement) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनीविरोधात लोकपाल (ombudsman) व ग्राहक मंच न्यायालयाकडे (Consumer Forum Court) तक्रार (complaint) करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती ग.स. सोसायटीचे अध्यक्ष (G.S. President of the Society) उदय पाटील यांनी दिली. तसेच या विमा कालावधीत ग. स. 14 सभासदांचा मृत्यू झाला असल्याने त्यांच्या विम्याच्या रकमेची मागणीदेखील आता ग. स. सोसायटी करणार आहे.

विमा इन्शुरन्स
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...
विमा इन्शुरन्स
करपंल पान, देवा जळलं शिवार!

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीने सभासद नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा पॉलिसी काढली होती. तसेच साडेतीन कोटींची रक्कम विमा कंपनीकडे भरली होती.

मात्र,विमा कंपनीकडे या ग्रुप विमा पॉलिसीबाबत तक्रारी असल्याचे कारण पुढे केले. मात्र, ज्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचा विमा रद्द करा, अशी भूमिका अध्यक्ष उदय पाटील यांनी मांडली होती. मात्र, विमा कंपनीने अचानक करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ग.स. सोसायटी विधीतज्ज्ञांशी चर्चा करुन विमा कंपनीविरोधात लोकपाल, ग्राहक मंचकडे तक्रार असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले.

विमा इन्शुरन्स
जळगाव रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण प्रणाली बंद

सभासदांच्या एकजुटीचा विजय

शिक्षक भारतीने या विम्यासंदर्भात केलेल्या तक्रारीत 2 हजार 496 सभासदांचा विरोध आहे. त्यात सभासदांनी केलेल्या मागणीनुसार संस्थेने सभासदांच्या हिश्श्यातील 1 हजार रुपयांची रक्कम परत करण्यात आलेली आहे. शिक्षक भारतीच्या काही सभासदांंनी विरोध झाल्यानंतर कंपनीने दोन महिन्यातच करार रद्द केला असून हा सभासदांच्या एकजुटीचा विजय असल्याचा दावा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com