कुपोषीत बालकाच्या कुटुंबियांची चौकशी समितीन घेतली भेट

दोन दिवसात सीईओंना अहवाल करणार सादर
जळगाव जि.प
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव | प्रतिनिधी jalgaon

यावल तालुक्यातील वड्री गावाजवळील आदिवासी पाड्यावरील त्या कुपोषित बालकांच्या Malnourished child पावरा कुटुंबीयांची त्रिस्तरीय चौकशी समितीने By a three-tier inquiry committee बुधवारी भेट घेतली असून अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी, यावल पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी आदींची सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. दोन दिवसात कुपोषित बालक मृत्यूप्रकरणाचा Malnourished child mortality Report अहवाल सादर करण्यात येणार आहे .

यावल तालुक्यातील वड्रीं आदिवासी पाड्यावरील कुपोषितबालकाचा ३१ जुलै रोजी मृत्यू झाला होता. या वृत्ताने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तात्काळ त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली होती.

यात समिती प्रमुख तथा जिल्हा महिला व बाल कल्याण विकास अधिकारी विजयसिंह परदेशी, पाचोरा गट विकास अधिकारी अतुल पाटील, चोपडा तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. लासूरकर आदींचे पथक वर्डी आदिवासी पाड्यावर आज ४ ऑगस्ट रोजी दाखल झाले असून या चौकशी समितीने त्या पावरा कुटुंबियांची भेट घेतली असून त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेऊन चौकशी केली.

तसेच आदिवासी पाड्याजवळील अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी आणि यावल पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली . कुपोषित बालक मृत्यू प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात आली असून दोन दिवसात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

दोन दिवसात अहवाल

वड्रीगावाजवळील आदिवासी पाड्यावर जाऊन त्या पावरा कुटुंबीयांची भेट घेतली असून वड्री परिसरातील अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी, यावल पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी आदींची चौकशी केली असून दोन दिवसात अहवाल सादर करण्यात येईल.

विजयसिंह परदेशी, जिल्हा महिला बालकल्याण विकास अधिकारी, जळगाव Vijay Singh Pardeshi, District Women Child Welfare Development Officer, Jalgaon

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com