मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळख

मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळख

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

धावत्या रेल्वेतून (Fallen from the train) पडलेल्या अनोळखी तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली होती. जखमी तरूणावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताजवळील मोबार्ईलमधील (mobile phone) सीमकार्डवरुन त्या तरुणाची ओळख (identity) पटली. राजाभैय्या लालचंद्र रावत (वय-20, रा. राजाखेडा ता. मौरवा, जि. उन्नाव उत्तरप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे.

मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळख
सभापती राष्ट्रवादीचा की ठाकरे गटाचा?
मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळख
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...

उत्तरप्रदेशातील राजाखेडा येथील राजाभैय्या रावत हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. कामानिमित्त तो पंढरपुर येथे गेला होता. याठिकाणी हातमजूरी करुन तो आपल्या कुटुंबाला हातभारल लावित होता. बुधवारी सकाळी राजाभैय्या हा आपल्या गावाकडील मित्रांसोबत आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. रेल्वेत तो दरवाजावळ बसलेला असल्याने असोदा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला होता.

मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळख
भाजपात दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष नेमले जाणार!

गंभीरअवस्थेत राजाभैय्याला तात्काळ काही तरुणांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असतांना गुरुवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याजवळ असलेला मोबाईलमधील सीमकार्ड पोलीस कर्मचारी वासुदेव मराठे यांनी आपल्या मोबाईलमध्ये टाकले. त्यावर राजाभैय्या याच्या भावाचा फोन आल्यामुळे मयताची ओळख पटल्यानंतर त्याचे कुटुंबिय जळगावलाव येण्यासाठी निघाले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वासुदेव मराठे हे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com