राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचा आदर्श ; सेवानिवृत्तीच्या दिवशीही काम केले सहर्ष

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचा आदर्श ; सेवानिवृत्तीच्या दिवशीही काम केले सहर्ष

धरणगाव - प्रतिनिधी dharangaon

जि.प.उच्च (zp) प्राथमिक शाळा धरणगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक (President Award winning teacher) पंढरीनाथ गिरधर पाटील हे आज दि.३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्याच दिवशी (Navodaya) नवोदय परीक्षा देखील होती. त्यांनी (Retirement) सेवानिवृत्तीच्या दिवशी, इंदिरा कन्या शाळेत (Indira Kanya School) जवाहर नवोदय परीक्षेचे सुपरविजनचे (Supervision) काम करून आपली कर्तव्यनिष्ठा सिध्द करुन समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या सकारात्मकतेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचा आदर्श ; सेवानिवृत्तीच्या दिवशीही काम केले सहर्ष
रमजान ईदसह अक्षय तृतीयेचा सण एकात्मतेच्या भावनेने साजरा करा!

शिक्षकाची उपक्रमशीलता, कर्तव्यावरील निष्ठा, जगण्यातील निस्पृहता, आणि निस्वार्थ वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम, वंचित, शोषित, पिडीत, अनाथ विद्यार्थ्यांना नेहमी आसरा देणाऱ्या शिक्षकाला शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करावेसे वाटते असे पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचा आदर्श ; सेवानिवृत्तीच्या दिवशीही काम केले सहर्ष
अमावस्येला पो.नि. के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रार

त्यांचा नवोदय विद्यालयचे प्रतिनिधी दिनेश गायकवाड यांच्या हस्ते सेवापुर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास केंद्रप्रमुख मनोहर पवार, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, ग्रेडेड मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, कैलास पवार दिलीप बाविस्कर, गोपाल विसावे, प्रवीण सूर्यवंशी, सुरेंद्र सोनवणे, छोटू धनगर उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचा आदर्श ; सेवानिवृत्तीच्या दिवशीही काम केले सहर्ष
देशदूत संवाद कट्टा : पशुवैद्यकीय दिन विशेष

आज उखळवाडी येथील जय गुरुदेव आश्रमात पी.जी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार संपन्न होत आहे.

Related Stories

No stories found.