पत्नीने तपकीर दिली नाही म्हणून पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथील घटना , संशयीत पोलिसांच्या ताब्यात
पत्नीने तपकीर दिली नाही म्हणून पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

धुळे - प्रतिनिधी dhule

शिरपुर (shirpur) तालुक्यात नटवाडे येथे पतीने पत्नीच्या (husband to wife) डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत हत्या (murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गीताबाई रामलाल पावरा वय 45 रा.नटवाडे ता.शिरपुर असे मयत महिलेचे नाव आहे. सदर घटना गुरुवार 18 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असून मयत महिलेचा पती रामलाल हजाऱ्या पावरा वय 50 याने तपकिर मागितल्याने तपकीर दिली नसल्याच्या रागातून त्याने पत्नी गीताबाई पावरा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची तक्रार मयत महिलेचे वडिल मुलसिंग आवा पावरा वय 60 रा उमर्दा ता शिरपुर याने शहर पोलीस (police) ठाण्यात दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख एपीआय गणेश फड पीएसआय किरण बा-हे संदीप मुरकुटे, गणेश कुटे, आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयीत रामलाल हजाऱ्या पावरा यास ताब्यात घेत अटक केली पुढील तपास एपीआय गणेश करीत आहे. मयत महिलेच्या नातेवाईकांनी दवाखान्यात एकच गर्दी केली असून संतांप व्यक्त करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com