सोमवारी विद्यापीठातील जलतरण तलावाचे राज्यपाल करणार उद्घाटन

शहराच्या प्रथम नागरीक तथा महापौरांनी केले विमानतळावर स्वागत
सोमवारी विद्यापीठातील जलतरण तलावाचे राज्यपाल करणार उद्घाटन

जळगाव jalgaon

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी जळगाव विमानतळावर (Jalgaon Airport) त्यांचे आगमन झाले. शहराच्या प्रथम नागरीक तथा महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनी त्यांचे शहराच्या व महापालिकेतर्फे स्वागत केले. दरम्यान. उद्या दि.28 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे (Swimming pool) राज्यापालांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

सायंकाळी विशेष विमानाने राज्यपालांचे (Governor) जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, (Guardian Minister Gulabrao Patil) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते खासगी वाहनाने जैन हिल्स येथे रवाना झाले.


जलतरण तलावाचे उद्घाटन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे (Swimming pool) उदघाटन (Inauguration) सोमवारी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी राज्यपालांचे विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या (Management Council) सभागृहात व्यवस्थापन परिषद सदस्यां समवेत ते चर्चा (Discussion) करणार आहेत. त्यानंतर विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उदघाटन श्री.कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com