पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

आमदार झाल्यानंतर नाथाभाऊ जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी पुन्हा मैदानात
पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

गत सहा वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर असलेले (Absent from active politics) एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) राष्ट्रवादीकडून विधानपरीषदेवर आमदार (Legislative Assembly MLA from NCP) झाल्यानंतर जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. जळगाव शहरातील रस्ते (Roads in Jalgaon city) आणि जिल्ह्यातील वाळू चोरी यासह विविध विषयांवर पावसाळी अधिवेशनात (monsoon session) सरकारला (government w) जाब विचारणार असल्याची माहिती आ. एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे भाजपाच्या सत्ताकाळापासून ते महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीपर्यंत सक्रीय राजकारणापासून दूर होते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथराव खडसे यांना संधी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. त्यामुळे खडसेंना आता लाल दिवा मिळणार अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र अचानक राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले आणि राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे नवीन सरकार स्थापन झाले.

पिंडच विरोधी पक्षाचा असल्याने एकनाथराव खडसे हे पुन्हा एकदा जिल्ह्यात विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आता मैदानात उतरले आहे. आ. यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची एकाच दिवशी भेट घेतली. या भेटीत जिल्ह्यातील अवैध धंदे, गुंडागर्दी, वाळू चोरी या विषयांवरून प्रमुख अधिकार्‍यांना कोंडीत पकडून त्यांच्यावर संगनमताचा घणाघाती आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या कृतीमुळे खडसेंमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याची झलक दिसू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

भाजपाच्या आ. महाजनांवर टीका

भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी प्रवीण चव्हाण प्रकरणात हॉटेलच्या बिलासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आ. एकनाथराव खडसे म्हणाले की, आ. महाजन हे सर्वच बिले माझ्या नावावर फाडतात. मविप्रमध्ये महाजनांनी काय गोंधळ घातला? हे जिल्ह्याला माहिती आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. मी फक्त बीएचआर घोटाळ्याबाबत मुद्दा उपस्थित केला असून तो तडीस नेणार असल्याचेही आ. खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com