तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल

हॉस्टेलमधून काढण्याची धमकी
तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

तरुणीला (girl's) महाविद्यालयातील हॉस्टेलमधून काढून टाका. नाही तर तीचे अश्लिल फोटो (obscene photos) व्हायरल (Viral)करेल अशी धमकी देत तरुणीचे फोटो व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात 22 वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि.22 मार्च रोजी अनोळखी मोबाईल धारकाने त्याच्या व्हॉटसपवरून तरूणीचा फोटोला अश्लिल फोटो मध्ये परिवर्तन करून एका व्यक्तीच्या मोबाईलवर पाठविला. दरम्यान, तरूणीला महाविद्यालयातील हॉस्टेलमधून काढून टाका नाही तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी संबंधित व्यक्तीला दिला.

त्यानुसार ही बाब संबंधित व्यक्तीने तरूणीला सांगितले. त्यानुसार तरूणीने सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी मोबाईल धारकावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com