अनर्थ टळला ; सुदैवाने ते दोघं बचावले

पुराच्या पाण्यात गाडी नेणे शिक्षक दांपत्याच्या जीवावर बेतले, चारचाकी गाडी गेली वाहुन
वाहुन जाणारी हीच ती कार
वाहुन जाणारी हीच ती कार

ऐनपुर - ता.रावेर raver

येथील एस.व्ही.महाजन व त्यांच्या पत्नी अर्चना महाजन रावेरहून ऐनपूर येथे घरी जात असतांना, अजंदा गावाजवळ जलसा हॉटेलजवळ पुराच्या पाण्यात त्यांची चारचाकी गाडी अडकली होती.

पुराचा जोर वाढत असल्याने, या ठिकाणी असलेल्या समीर मण्यार,रोहित तडवी,सुमित पाटील, तुषार सोनार, ऋषीकेश पाटील या युवकांनी दोघांना गाडीतून उतरवून ठिबकच्या नळ्यांच्या साहाय्याने पाण्यातून बाहेर काढले.त्यानंतर चारचाकी गाडी मात्र पुरात वाहून गेली आहे. या घटनेने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते.पती-पत्नी बचावल्याने मोठी दुर्घटना टळली आहे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com