धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील मुंदखेडे (Mundkhede) परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) वनविभागाच्या (Forest Department) पिंजऱ्यात अडकला आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी (farmer) सुटकेचा सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
धुळ्यात गोळ्या घालत एकाची हत्या ; दोन संशयीत ताब्यात

गेल्या पंधरा दिवसापासून मुंदखेडे परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांची जनावर फस्त केली होती. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. वन विभागाने दोन दिवसापूर्वीच या परिसरात पिंजरा लावला होता. बिबट्याच्या खाण्यासाठी पिंजऱ्यात बोकडा ठेवला होता. आज बोकड्या खाण्यासाठी बिबट्याला आणि जेरबंद झाला. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून, त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com