देवीची ज्योत घेेवून येणार्‍या तरुणाच्या जीवनाची ज्योत मालावली

तालुक्यातील वाघळी येथे के.टी.वेअरमध्ये बुडून पहुर(ता.जामनेर) येथील तरुणांचा मृत्यू
देवीची ज्योत घेेवून येणार्‍या तरुणाच्या जीवनाची ज्योत मालावली

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

घटनस्थापनेसाठी देवीची ज्योत सप्तश्रृंगी गडावरुन घेवून येत असताना, तालुक्यातील वाघळी येथे आंघोळीसाठी बंधार्‍यात उतरलेल्या पहुर ता.जामनेर येथील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

देवीची ज्योत घेेवून येणार्‍या तरुणाच्या जीवनाची ज्योत मालावली
नंदुरबारातील सर्व अकरा जागांचे निकाल जाहीर, भाजपच्या जागा घटल्या

ही दुर्दैवी घटना आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. पावसामुळे तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढता आला नाही. घटनास्थळी पोलीसांंनी धाव घेतली असून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. मयताचे नाव सुनिल रामदास वाघमारे (१८) असे आहे.

Related Stories

No stories found.