जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

धरणगाव येथील तरुणाचा जळगावात मृत्यू; पोलिसात नोंद
जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

यंदा जळगावात सर्वाधिक तापमानाची नोंद (Record the highest temperature) झाली आहे. दरम्यान, जळगावात उष्माघाताचा पहिला बळी (first victim of heatstroke) गेला असून किशोर ज्योतीराम खलपे (वय-37, रा. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (Death record) करण्यात आली आहे

धरणगाव येथील किशोर खलपे हे पंधरा दिवसांपासून शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणार्‍या आपल्या बहिणीकडे आले होते. याठिकाणी त्यांनी गुरुवारी दिवसभर काम केले. याठिकाणी त्यांना उष्माघाताचा (heatstroke) फटका बसल्याने ते सायंकाळच्या सुमारास ते हरविठ्ठल नगरातील रिक्षा स्टॉपजवळ गेले असता, त्याठिकाणी खलपे हे चक्कर येवून जमिनीवर कोसळले. त्यांना परिसरातील नागरिकांसह त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी त्यांचा मृत्यू उष्माघाताने (Death by heatstroke) झाला असल्याची नोंद रामानंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपासस हवालदार उषा सोनवणे या करीत आहे.

तीन वर्षापुर्वी आईचे तर उष्माघाताने वडीलांचे हरपले छत्र

तीन वर्षांपुर्वी किशोर खलपे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून हे चिमुकलेे आपल्या वडीलांसोबतच राहत होते. कामानिमित्त ते धरणगाव येथून जळगावात आले होते. परंतु येथे उष्माघाताने (Death by heatstroke) त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांची तीघ मुलांवरील छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

जिल्ह्यात पहिल्या उष्माघाताची नोंद

राज्यात सर्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे. यंदाच्या तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी उष्माघाताचा पहिल्या रुग्णाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याने जिल्ह्यात पहिला उष्माघाताचा बळी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com