रावेरात आज होणार गझलवैदर्भीचे पहिले राज्यस्तरीय मराठी गझल संमेलन

रावेरात आज होणार गझलवैदर्भीचे पहिले 
राज्यस्तरीय मराठी गझल संमेलन

रावेर Raver|प्रतिनिधी-

रावेरात आज 27 नोव्हेंबर शनिवार रोजी गझलवैदर्भीचे (Ghazal of Vaidarbhi) पहिले राज्यस्तरीय (First state level) मराठी गझल संमेलन (Marathi Ghazal Sammelan) होत आहे.

या गझल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष (Central President of Ankur Sahitya Sangh) प्रसिद्ध साहित्यिक हिंमत ढाळे हे आहेत तर उदघाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक सेवानिवृत्त अभियंता डॉ. प्रमोद काकडे हे आहेत.संमेलनाचे स्वागताध्यक्ष गझलेचा बादशहा चंद्रशेखर भुयार आहे.यामध्ये गझलेवरील व्याख्यान प्रसिद्घ गझलकार शिवाजी जवरे हे सादर करतील,गझल मुशायरे दोन होणार असून या पहिल्या गझल मुशायराचे अध्यक्ष बबन धुमाळ (पूणे )असतील पहिला गझल मुशायरा दुपारी 2 वाजता सुरू होईल तर दुसऱ्या मराठी गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. गणेश गायकवाड हे आहेत, दुसरा मुशायरा रात्री ठीक 7 वाजता सुरू होईल,तसेच सम्मेलनातमध्ये अभिरुप न्यायलय असून आरोपी जनार्दन मात्रे ,वकील प्रा रुपेश देशमुख व प्रा रवी चापके हे आहेत तर न्यायधिशाची प्रमुख भुमिका कवी किरण डोंगरदिवे पार पाडणार आहेत, अभिरुप न्यायालय कार्यक्रम दुपारी 1 ते 2 या वेळेत होईल , मराठी गझल मुशायरा चे संचलन प्रा रवी चापके प्रफुल्ल भुजाडे आणि विद्यानंद हाडके हे करणार आहेत.या संमेलनात विशेष उपस्थिती माजी मंत्री एकनाथराव खडसे ,आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील,रंजना पाटील (अध्यक्ष जि प जळगाव),खा.रक्षाताई खडसे,कविता कोळी (सभापती पं स रावेर),दारामोहम्मद (नगराध्यक्ष रावेर),मुकेश दलाल,उद्योजक श्रीराम पाटील, भागवत पाटील , डॉ संदिप पाटील,संजय अग्रवाल हे उपस्थित राहणार आहे.या संमेलनास महाराष्ट्र्रातील नामवंत गझलकार उपस्थित राहणार आहेत तरी आपण या संमेलनास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com