
सुनसगाव Sunasgaon ता भुसावळ वार्ताहर -
येथील गट नंबर ३०८ मध्ये असलेल्या सुदर्शन पेपर मील ला दि.२८ रोजी सकाळी १० वाजता आग लागली असता आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास ५० बंब लागले होते आता जेसीबी व ट्रॅक्टर व्दारे आगीच्या ठिकाणाहून साहित्य बाजूला नेण्याचे काम सुरू आहे. मात्र अजूनही आगीची धगधग सुरुच आहे .
गेल्या २४ तासा पासून सतत पाणी मारले जात आहे परंतु वाऱ्याचा जोर कायम असल्याने पाणी मारुन ही आग पुर्णपणे आटोक्यात आलेली नाही . आताही आगेची धगधग सुरू आहे.त्यामुळे टॅंकर ने पाणी मारणे सुरूच आहे.ही आग पुर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी चार दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनीचे कामगार दिवसरात्र कामाला लागले असून जो तो आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
या आगीत एका सिलेंडर चा स्फोट झाल्याचे समजते.कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते तसेच पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला असून तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.