प्रकाशोत्सवाला आजपासून प्रारंभ

आज वसुबारस; उद्या धनत्रयोदशीचा मुहूर्त
प्रकाशोत्सवाला आजपासून प्रारंभ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दिवाळी उत्सवास (Diwali festival) आज वसुबारसने (Vasubars) सुरवात होत असून शहरातील गो-शाळेत याबाबत समाजिक संस्थाकडून (social institution) कार्यक्रम होत आहे. तसेच हा दिपोत्सव (Celebrating Dipotsav) साजरा करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी (shopping in the market) नागरिकांची प्रचंड गर्दी (crowd of citizens) झालेली होती. त्यामुळे सायंकाळी शहरातील रस्ते गर्दीने अक्षरश: फुलले होते.

प्रकाशोत्सवातील पहिली तिथी म्हणजे वसुबारस. हा वसुबारस सण उद्या दि. 21 रोजी साजरा केली जाणार आहे. वसुबारस नंतर दि. 22 रोजी धनत्रयोदशी, 24 रोजी लक्ष्मीपूजन तर 26 रोजी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दिवाळीनिमित्त गुरूवारी बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली होती. शहरातील चौकांमध्ये लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती.

चोपडा वहीचे वाढले दर

व्यापारी, दुकानदारांचे दररोज तसेच वार्षिक हिशोबाची डायरी (चोपडा वही)चे लक्ष्मीपूजनला पुजन करण्याची परंपरा आहे. या चोपडा वही खरेदीसाठी आज दुकानांवर गर्दी दिसत होती. कागद महाग झाल्याने यंदा चोपडा वहीचे दर 20 टक्क्यांनी वाढलेले आहे. 200 रु. ते 500 रुपयांपर्यंतच्या लहान मोठ्या आकारात चोपडा वही उपलब्ध आहेत.

लक्ष्मीच्या मुर्ती घेण्यासाठी लगबग

दिवाळीला लक्ष्मी पुजनासाठी सुबक आकर्षक लक्ष्मीच्या मुर्त्यां बाजारात दाखल झाल्या आहे. बाजारपेठेत मुर्ती विक्रेत्यांचे दुकाने थाटलेले असून लक्ष्मीच्या मुर्त्या खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. 100 रुपयांपासून तर 500 रुपयांपर्यंतच्या मुर्त्यांची खरेदी करण्यात आली.

श्रीराम रांगोळी गृपतर्फे गोवत्स धन पुजनाचा कार्यक्रम उद्या दि. 21 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम पांझर पोळा येथे महारांगोळी रेखाटून होणार आहे. तसेच आमदार राजुमामा भोळे व माजी महापौर सिमा भोळे यांच्या हस्ते गाय वासराची पुजा केली जाणार आहे. या कार्यक्रमास गो-प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कुमूद नारखेडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com