जळगाव jalgaon । प्रतिनिधी
कुटुंबिय (family) माहेरी लग्नासाठी (wedding) गेलेले असल्याने घरात एकट्याच असलेल्या ज्ञानेश्वर रमेश कोळी (वय-35) रा. खेडी कढोली ता.एरंडोल या तरुणाने (young man) विषारी औषध सेवन (consuming poison) करून आत्महत्या ( suicide)केल्याची घटना गुरूवारी 4 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे ज्ञानेश्वर कोळी हा आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. शेतमजूरीचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाहर करीत होता. ज्ञानेश्वर कोळी यांच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्याने पत्नी अनिता आणि दोन्ही मुलांसह अमळनेर येथे लग्नासाठी बुधवारी दि. 3 मे रोजी सकाळी 9 वाजता गेले होते.
दरम्यान, दुपारी ज्ञानेश्वर कोळी हा अमळनेर येथून खेडी कढोली येथे आला. त्यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले ही अमळनेरला थांबलेली होती. रात्री 9 वाजता घरी आल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात होते. दरम्यान, मध्यरात्री ज्ञानेश्वर कोळी याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. हा प्रकार गुरूवारी 4 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास लक्षात आले. शेजारी राहणार्या ग्रामस्थांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले
. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.