दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक

सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयितांच शोध सुरु; पथके रवाना
दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सिक्युरीटी गार्ड (Security guard) कुत्र्याला फिरवायला घेवून गेल्यानंतर दरोडेखोरांनी दरोड्याचा (Attempted robbery by robbers) प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री रिंगरोडवरील अजय कॉलनीत (Ajay Colony) घडली. घरात शिरल्यानंतर बच्छाव कुटुंबियांना (Bachhao family) नकली बंदूकीचा (fake gun) धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. परंतू आरडाओरड (screaming)झाल्याने दरोडेखोरांनी घरातून पलयान (robbers escaped from the house)केले. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) कैद झाले असून पोलिसांनी ते ताब्यात ()Police in custody घेतले आहेत. दरम्यान, एलसीबीसह जिल्हापेठ पोलिसांचे पथक संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक
Accident# भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले

शहरातील वाहनक्षेत्रातील व्यावसायीक किरण बच्छाव हे कुटुंबयांसह रिंगरोडवरील अजय कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांच्या बंगल्यावर सिक्युरीटी गार्ड म्हणून गणेश लिलाधर अत्रे हे नोकरीस असून रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत ड्युटी बजावित असतात. सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास किरण बच्छाव यांनी कुटुंबियांसह जेवण केले.

त्यानंतर गणेश अत्रे हे कुत्र्याला घेवून त्याला फिरविण्यासाठी आयएमआर महाविद्यालयाकडे गेले. याचवेळी दोन इसमांनी बच्छाव यांच्या घराची बेज वाजविली असता वेदांती बच्छाव या दरवाजाकडे गेल्या. दरवाजाच्या बाहेर उभे मास्क लावून उभे असलेल्या इसमांनी ओ कुता तुम्हारा हे का? असे विचारले.

वेदांती यांनी त्यांना हो म्हणताच कुत्र्याला ते बाबांनी फिरवायला गेलेत ते बेहोश पडलेत असे म्हणताच वेदांनी यांनी लागलीच दरवाजा उघडताच घराबाहेर उभ्या असलेल्या दरोडेखोर वेदांती यांचा गळा दाबून घरात शिरले. आणि त्यांनी बच्छाव कुटुंबियांना दोरीने बांधण्याचा प्रयत्न करुन त्यांच्यावर नकली बंदूक ताणून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सुमारे सात ते आठ संशयितांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक
धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

शोधार्थ पथके रवाना

जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजकाच्या घरात दरोडा टाकल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील सर्व दरोडेखोरांची चौकशी केली जात आहे. तसेच संशयितांच्या शोधार्थ जिल्हापेठ व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक रवाना झाले आहे.

रेकी केल्यानंतरच टाकला दरोडा

दरोडेखोर काही दिवसांपासूनच बच्छाव यांच्या कुटुंबियांवर नजर ठेवून होते. ते घरी केव्ह येतात त्यानंतर सिक्युरीटी गार्ड कुत्र्याला केव्हा बाहेर फिरायला घेवून जातात. याची संपुर्ण निरीक्षण केल्यानंतरच त्यांनी नियोजनबद्ध दरोडा टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. आरडाओरड झाल्यामुळे नागरिकांची गर्दी जमा होत असल्याचे समजताच दरोडेखोरांनी बच्छाव यांच्या पत्नीचा मोबाईल हिसकावून त्याठिकाणाहून पळ काढला.

दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक
Good news : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर!
दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक
दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा

वेगवेगळ्या मार्गाने आले दरोडेखोर

दरोडा टाकण्यापुर्वी चार दरोडेखोर एका रस्त्याने पायी चालत बच्छाव यांच्या बंगल्यापर्यंत पोहचले. दरम्यान, परिसरातील नागरिकांना संशय येवू नये म्हणून उर्वरीत दरोडेखोर हे दुसर्‍या मार्गाने त्याठिकाणी आल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. तसेच रस्त्याने येत असतांना त्यांनी तोंडाला रुमाल, मास्क, अंगात जॅकेत आणि डोक्यावर थंडीची टोपी घातली होती.

दरोडेखोरांनी वापरली नकली बंदूक
धुळ्यात रेशनचा तांदूळ पकडला, ट्रकसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com