जळगाव महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलणार

भाजपच्या १३ बंडखोर नगरसेवकांची घरवापसी
जळगाव महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलणार

जळगाव (Jalgaon) -

जळगाव महानगरपालिकेत (Municipal Corporation) सहा महिन्यानंतर पुन्हा फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सहा महिन्यांपुर्वी भाजपच्या ३० बंडखोर नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांनी घरवापसी केल्याचा दावा आ. राजूमामा भोळे यांनी केला आहे. चार दिवसांपुर्वी ३ नगरसेवक, मंगळवारी १ तर बुधवारी ९ असे एकूण १३ नगरसेवक स्वगृही परतले आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यत आहे.

महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ५७ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महानगरपालिकेवर भाजपने निर्विवादपणे सत्ता स्थापन केली. मात्र अडीच वर्षातच भाजपमधील पहिल्या टप्प्यात २७ तर दुसर्‍या टप्प्यात ३ नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यामुळे भाजपला आपली सत्ता गमवावी लागली होती. २७ बंडखोर नगरसेवकांच्या पाठींब्यावर शिवसेनेने सत्ता स्थापन केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे तसेच अपात्रतेच्या कारवाईपोटी काही बंडखोर नगरसेवकांनी परत येण्याची अपेक्षा बोलून दाखविली होती. त्यानुसार चार दिवसांपुर्वी सुरेश सोनवणे, शोभा बारी, हसीनाबी शेख या तिघांनी तर मंगळवारी प्रिया जोहरे आणि बुधवारी रंजना सपकाळे, मीना सपकाळे, कांचन सोनवणे, मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, रुक्साना बी खान, प्रवीण कोल्हे, दत्तात्र्य कोळी हे भाजपमध्ये परतले आहे.

अजून बंडखोर परतणार असल्याचा दावा

भाजपच्या ३० बंडखोर नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. येत्या काही दिवसात आणखी बंडखोर नगरसेवक स्वगृही येणार असल्याचा दावा देखील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. भाजप आता बहुमताचा आकडा पार करीत असल्याचा दावा करीत असल्याने आगामी काळात महानागरपालिकेतील सत्तचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जी. एम. फाऊंडेशनमध्ये बंडखोरांचे केले स्वागत

महानगरपालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे गटनेते कोण यावर दावे प्रतिदावे केले जात आहे. स्थायी समितीत सदस्यांना नावे नामनिर्देशीत करण्याचा अधिकार गटनेत्यांना आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला बहूमत सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांची गरज असल्याने काही बंडखोर नगरसेवकांना घरपावसी आणण्यासाठी रणनिती अवलंबली. त्यानुसार १३ बंडखोर नगरसेवक परतले असून बुधवारी जी. एम. फाऊंडेशन (G. M. Foundation) येथे आ. राजूमामा भोळे यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवकांनी स्वगृही परतलेल्या बंडखोर नगरसेवकांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.