
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
राज्यातील (maharastra) अनेक मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी ड्रेसकोडची (dress code) सक्ती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराट्र मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. दि. 31 मे रोजी झालैल्या बैठकीत जिल्ह्यात असलेल्या मंदिरानी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला होता. त्यानुसार आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोराळ्यातील श्री बालाजी मंदिर, श्री मनुदेवी मंदिर, श्री पद्मालय देवस्थान यासह 34 मंदिरामध्ये आठवड्याभरात वस्त्रसंहिता मागून करण्यात येणार आहे.
तसेच देशातील अनेक क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे मत या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी व्यक्त केले. ओंकारेश्वर मंदिराचे जुगल किशोर जोशी आणि एरंडोल येथील प्राचीन श्री पद्मालय मंदिराचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पावित्र्य, मांगल्य अन् संस्कृती टिकविण्यासाठी भूमिका
पारोळा बालाजी मंदिराचे विश्वस्त केशव क्षत्रिय म्हणाले की, भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. यावेळी बोलतांना सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव नीलकंठ चौधरी म्हणाले की, मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. मंदिरांची संस्कृती, पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मंदिरात प्रवेश करतांना अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून येऊ नये अशी आमची भूमिका असून यासाठी आम्ही वस्त्रसंहिता लागू करत असून तसे फलक देखील लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.