जिल्ह्याला मिळणार सात नवीन पोलीस निरीक्षक

पदोन्नती मिळालेल्या दोघ पोलीस निरीक्षक मात्र प्रतिक्षा यादीत
जिल्ह्याला मिळणार सात नवीन पोलीस निरीक्षक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या (police inspectors) बदल्यांचे (transfer Order) आदेश शासनाने काढले आहे. यामध्ये दोन महिलांसह पाच असे एकूण सात नवीन पोलीस निरीक्षकांची (new police inspector) नियुक्ती (appointment) करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या पोलीस ठाण्यांना नवीन पोलीस निरीक्षक मिळणार आहे.

राज्य शासनाकडून राज्यभरातील 335 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून पदोन्नती मिळालेले दिलीप भागवत व बाबासाहेब ठोंबे या दोन पोलीस निरीक्षकांसह सुरेश शिंदे यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर उर्वरीत रिक्त झालेल्या जागांवर सात नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बदली होवून आलेल्या कोणला कोणते पोलीस ठाणे मिळेल याची उत्सुकता आता लागून आहे.

दोन महिला पोलिसांसह पाच जणांची नियुक्ती

बुलढाणा येथील राजेंद्र प्रल्हाद पाटील, औरंगाबाद शहर येथील शरद नाथाजी इंगळे, राज्य गुप्तवार्ता विभागातील कावेरी महादेव कमलाकर, पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील शिल्पा गोपीचंद पाटील, मुंबईतील संदीप भटू पाटील तर गोंदिया येथून बबन मारोती आव्हाड, रंगनाथ त्र्यंबक धारबडे, उद्धव कोंडींबा डमाळे यांची जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com