
रावेर|प्रतिनिधी raver
ग्रामपंचायत (Gram Panchayat) यंत्रणा काम सांगूनही ऐकत नसेल तर रागात माणूस काय करेल या बद्दल काही सांगता येत नाही. असाच विचित्र प्रकार विवरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीत घडला आहे.
येथील बाजार परिसरात सकाळी मांजर मेलेलं रस्त्यावर पडलं होतं, याबाबत पंकज पाटील याने ग्रामपंचायत स्वच्छता विभागाला माहिती दिली, दोन तीन वेळा सांगूनही उपयोग होत नाही, यावर संतापलेल्या पंकज पाटीलने थेट मेलेलं मांजर ग्रामपंचायतीत आणून टाकले आणि हा प्रकार सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्याने गावात एकच चर्चा यामुळे झाली आहे. नंतर ग्रामविकास अधिकारी जावळे यांनी संबंधित कर्मचारी यांना हे मांजर नेण्यास सांगून वादावर पडदा पडला.