बालिकेचा छळ करणारे दाम्पत्य मोकाटच

पोलिस कायदेशीर बाबी तपासणार : अनेक प्रश्न उपस्थित
बालिकेचा छळ करणारे दाम्पत्य मोकाटच

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

येथील सिंधी कॉलनीतील (Sindhi Colony) आठवाणी परिवाराकडेे (Athavani family) घर काम (Home workers) करणार्‍या 15 वर्षिय बालिकेचा (15-year-old girl) छळ केल्या प्रकरणी (case of harassment) दाखल गुन्ह्यातील (filed crime) आरोपी दाम्पत्य (Accused couple) गुन्ह्याच्या 24 तासानंतर मोकाटच (free) आहे. या प्रकरणात पोलिसांना (police) अनेक कायदेशीर बाबी तासून गुन्ह्याचा तपास करावा लागणार आहे. या प्रकरणी नागरिकांतून अनेक संवेदनशील प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी नरेश आठवाणी व राधा आठवाणी यांनी घरकामासाठी 50 हजार रुपयात बालिकेला खरेदी केल्याची तसेच तीचा छळ केल्या प्रकरणी पिडित 15 वर्षिय बालिकेच्या तक्रारीवरुन दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपी दाम्पत्यास अटक झालेली नाही. पिडित बालिकेची बाल सुधार गृहात रवाणगी करण्यात आली असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, आठवाणी दाम्पत्याकडून छळ होत असल्याची तक्रार बालिकेचे दिली आहे. त्यात आई, वडिलांनी 50 हजारात विकल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पिडीतेच्या पालकांना ही आरोपी करता येईल का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, आपत्ये सांभाळण्याची ऐपत नसलेल्या पालकांना बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी दत्तक किंवा अशा प्रकारे संगोपणासाठी दसर्‍या व्यक्तिकडे आपले आपत्य कायदेशीर बाबी पूर्णकरुन देता येतात.

मात्र या घटनेत संबंधित दाम्पत्य व पालकांकडून अशा प्रकारची कुठल्याच कायदेशीर बाबी किंवा दत्तक पत्राची नोंद करण्यात आली नसल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात आरोपींच्या अटकेसह पालकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो का? याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी बाजारपेठ पोलिसांना करावी लागणार आहे. अल्पवयीन बालिकेला घर कामासाठी लावणेहा ही बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन दिवसांनीन तपास अधिकारी पिडित बालिकेचा बालसुधार गृहत जाऊन जबाब नोंदविणार असल्याचे समजते.

बालिकेची विक्री करुन तीला घरकामासाठी लावण्यात आल्यामुळे या प्रकरणी समाजमनातून अनेक प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहे. त्यानुसार, संबंधित दोन्ही कुटुंबात याबाबात खरच आर्थिक व्यवहार होऊन बालिकेची विक्री झाली का? कायदेशीर बाबी का पूर्ण केल्या नाहीत? बालिकेने घरातून पळ काढून पोलिस ठाणे गाठल्याने तीचा दाम्पत्याकडून छळ होत होता का? तीला घरात डांबून ठेवले होते का?

अल्पवयीन बालिकेकडून घरकाम करुन घेतले जात असल्याने या प्रकारणी बाल कामगार कायद्यानुसार कारवाई होणार? बालिकेचा लैंगिक छळ झाला का? किंवा पोक्सो कायद्यानुसार या प्रकरणाची तपासणी होणार का? असे अनेक प्रश्न या प्रकरणात उपस्थित होत आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांना, अनेक बाबींची कायदेशीर तपासणी करुन गुन्ह्याचा तपास करावा लागणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडू सर्वांगिण बाबींचा तपास होणे गरजेचे आहे.

येथील सिंधी कॉलनीतील आठवाणी परिवाराकडेे घर काम करणार्‍या 15 वर्षिय बालिकेचा छळ केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी दाम्पत्य गुन्ह्याच्या 24 तासानंतर मोकाटच आहे. या प्रकरणात पोलिसांना अनेक कायदेशीर बाबी तासून गुन्ह्याचा तपास करावा लागणार आहे. या प्रकरणी नागरिकांतून अनेक संवेदनशील प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी नरेश आठवाणी व राधा आठवाणी यांनी घरकामासाठी 50 हजार रुपयात बालिकेला खरेदी केल्याची तसेच तीचा छळ केल्या प्रकरणी पिडित 15 वर्षिय बालिकेच्या तक्रारीवरुन दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपी दाम्पत्यास अटक झालेली नाही. पिडित बालिकेची बाल सुधार गृहात रवाणगी करण्यात आली असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, आठवाणी दाम्पत्याकडून छळ होत असल्याची तक्रार बालिकेचे दिली आहे. त्यात आई, वडिलांनी 50 हजारात विकल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पिडीतेच्या पालकांना ही आरोपी करता येईल का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, आपत्ये सांभाळण्याची ऐपत नसलेल्या पालकांना बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी दत्तक किंवा अशा प्रकारे संगोपणासाठी दसर्‍या व्यक्तिकडे आपले आपत्य कायदेशीर बाबी पूर्णकरुन देता येतात.

मात्र या घटनेत संबंधित दाम्पत्य व पालकांकडून अशा प्रकारची कुठल्याच कायदेशीर बाबी किंवा दत्तक पत्राची नोंद करण्यात आली नसल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात आरोपींच्या अटकेसह पालकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो का? याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी बाजारपेठ पोलिसांना करावी लागणार आहे. अल्पवयीन बालिकेला घर कामासाठी लावणेहा ही बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन दिवसांनीन तपास अधिकारी पिडित बालिकेचा बालसुधार गृहत जाऊन जबाब नोंदविणार असल्याचे समजते.

बालिकेची विक्री करुन तीला घरकामासाठी लावण्यात आल्यामुळे या प्रकरणी समाजमनातून अनेक प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहे. त्यानुसार, संबंधित दोन्ही कुटुंबात याबाबात खरच आर्थिक व्यवहार होऊन बालिकेची विक्री झाली का? कायदेशीर बाबी का पूर्ण केल्या नाहीत? बालिकेने घरातून पळ काढून पोलिस ठाणे गाठल्याने तीचा दाम्पत्याकडून छळ होत होता का? तीला घरात डांबून ठेवले होते का?

अल्पवयीन बालिकेकडून घरकाम करुन घेतले जात असल्याने या प्रकारणी बाल कामगार कायद्यानुसार कारवाई होणार? बालिकेचा लैंगिक छळ झाला का? किंवा पोक्सो कायद्यानुसार या प्रकरणाची तपासणी होणार का? असे अनेक प्रश्न या प्रकरणात उपस्थित होत आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांना, अनेक बाबींची कायदेशीर तपासणी करुन गुन्ह्याचा तपास करावा लागणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडू सर्वांगिण बाबींचा तपास होणे गरजेचे आहे.

दाम्पत्यांचे नाशिक कनेक्शन काय?

सदर बालिकेच्या वडिलांचे मुळ गाव यावल तालुक्यातील आहे. तसेच मागील तीन वर्षांपूर्वी बालिकेचे वडिल शहरात एका ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामावर काम करत होते. आई काम करुन पोट भरत होती. यावेळी सदर कुटुंबाची आठवाणी कुटुंबाशी संपर्क आला. त्यानंतर बालिकेची आई आठवाणी यांच्याकडे घरकाम करत होती. त्यानंतर सदर कुटुंब नाशिक येथे स्थलांतरित झाले होते. त्यानंतर बालिकेला आठवाणी कुटुंबाने त्यांच्या घरी आणले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com