ऑडीओ क्लिपमधील संभाषणाचा उलगड्यासाठी अटक आवश्यकच

बकालेच्या अटकपुर्व अर्जावर जोरदार युक्तीवाद करीत नोंदविली हरकत
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मराठा समाजाविषयी (Maratha community) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) करणार्‍या निलंबित (Suspended) पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले (Police Inspector Kiran Kumar Bakale) यांनी अटकपुर्व जामिनीसाठी (anticipatory bail) न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी कामकाज झाले. यामध्ये बकाले यांनी केलेले वक्तव्य हे समाजातील प्रत्येकाला ईजा पोहचविणारे असून संभाषणातील सर्व बाबींचा उलगडा होण्यासाठी त्यांना अटक (arrested) होणे आवश्यक आहे. असा जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने सर्व पक्षकारांचा युक्तीवाद व हरकती नोंदवून घेतल्या असून दि. 26 रोजी त्यावर निर्णय होणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी हजेरी मास्तर अशोक महाजन यांच्यासोबत बोलतांना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायर झाल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळून राज्यभरात आंदोलन झाली होती. याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बकाले यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी जिल्हा न्यायालयात कामकाज पार पडले. या अर्जावर दुपारी सुनावणी झाली असता, सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांच्यासह फिर्यादी व समाजाच्यावतीने अ‍ॅड. गोपाळ जळमकर, अ‍ॅड. मोहन पाटील, अ‍ॅड. सचिन पाटील यांनी युक्तीवाद करीत बकाले यांनी केलेले वक्तव्य हे समाजातील प्रत्येक माणसाला ईजा पोहचविणारे आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यामुहे जनप्रक्षोभक वाढलेला असून या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास कामात सर्व बाबींचा उलगडा होणे गरजेचे आहे. त्यामुळे अटकपूर्व अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला.

गुन्ह्यात कलम वाढविले

तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात 354 (अ) हे कलम वाढविण्यात आले आहे. त्यानुसार न्यायालयात आज सरकार व फिर्यादी यांच्या पक्षकारांकडून युक्तीवाद करीत बकालेंच्या अटकपुर्व जामीनावर हरकत घेतली. दरम्यान, न्यायालयान निकाल राखून ठेवला असून दि. 26 रोजी सोमवारी अर्जावर निकाल दिला जाणार आहे.

कडेकोट बंदोबस्तात पार पडले कामकाज

सुनावणी पुर्वीच न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह चारही पोलीस निरिक्षक व कर्मचा-यांचा मोठा ताफा होता. तसेच मराठा समाज बांधवांची सुध्दा न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com