पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती...

पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती...

पारोळा Parola

पारोळा तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Elections) हाती लागलेल्या निकालात (result) आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा (Balasaheb's Shiv Sena) भगवा फडकला आहे.

पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती...
रावेर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का !

तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल आज पार पडला. यात मेहू, धुळपिंप्री, सावखेडा होळ, सावखेडे मराठ, सावखेडे तुर्क, कन्हेरे, कराडी, कंकराज व राजवड या गावांचा समावेश होता. यात आमदार चिमणराव पाटील यांनी गावातील जातीय सलोखा, गावाचा विकास व गावातील एकता कायम राहावी या दृष्टीने सर्वच ग्रामपंचायतींना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन  केले होते. यात कराडी, सावखेडे होळ व सावखेडे मराठ या ग्रामपंचायतींनी आपली निवडणूक बिनविरोध केली तर मेहू गावात जाहीर पाठींबा दर्शवत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती...
VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

यात कराडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच पूनम मनोहर पाटील यांचेसह ७ सदस्य, सावखेडे मराठ ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच गोपाल सुरेश पाटील यांचेसह ६ सदस्य व सावखेडे होळ ग्रामपंचायतीवर हरसिंग नाना पाटील पुरस्कृत लोकनियुक्त सरपंच राजू मंगा ठाकरे, उपसरपंच सुरेखा रामचंद्र पाटील यांचेसह ७ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर मेहू ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांचेसह ७ सदस्य, सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीबाई दिलीप रामोशी यांचेसह ३ सदस्य,

कंकराज ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच आशाबाई राजाराम पाटील यांचेसह ३ सदस्य व कन्हेरे ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच अनिता सुकदेव भिल यांचेसह ७ सदस्यांनी विजय संपादन केला.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वर्चस्व सिध्द झाल्याचे स्पष्ट झाले असून आमदार चिमणराव पाटील हे नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनाला असतांना त्यांनी सर्व बिनविरोध व विजयी उमेदवारांना दूरध्वनी द्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती...
VISUAL STORY :सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com