जिल्हाधिकार्‍यांनी पकडली वाळूची वाहने

ट्रॅक्टर अन् डंपर जप्त ; आठ जणांविरूध्द कारवाईचे आदेश
जिल्हाधिकार्‍यांनी पकडली वाळूची वाहने

जळगाव । Jalgaon

शहरासह तालुक्यात वाळूची सर्रासपणे अवैध वाहतुक होत असतांनाही तहसीलदारांकडून मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने चक्क जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि डंपर पकडल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात वाळू ठेक्याची मुदत संपुष्टात आली असल्याने अवैधपणे सर्रास चोरी होत आहे. ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातून ही चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मिळाली. त्यानुसार जिल्हाधिकारी मित्तल यांनी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि डंपर क्र. एम.एच.-सीवाय- 6161 व रेकी करणारी इंडीका कार अशी तीन वाहने पकडली.

ही तीनही वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच वाळूची चोरटी वाहतूक करणारे शालिक नन्नवरे, तुकाराम गुलाब कोळी, कैलास रघुनाथ सोनवणे (तिघे रा. बांभोरी), महेश मधुकर कोळी (रा. नागदुली), सागर दिलीप कोळी, गजानन प्रकाश बाविस्कर, मुकेश प्रकाश सपकाळे, अनिल रमेश बाविस्कर (रा. निमखेडी) यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com