
अमळनेेर Amalner
"माझे माहेर पंढरी, आहे बोरी च्या ग तीरी" हे गीत गुणगुणत वाणी समाजातील (Vani society) शेकडो विवाहित लेकी (Married Leckie) एकाचवेळी अमळनेर नगरीत दाखल झाल्याने या लेकींच्या आगमनाने प्रतिपंढरपूर संबोधली जाणारी अमळनेर नगरी फुलली होती,या नगरीत सुयोग महिला मंडळाच्या संकल्पनेतून विवाह झालेल्या वाणी समाजातील शेकडो लेकींचा स्नेहमेळा (Sneh Mela) नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ठ स्वरूप,लेकींचे झालेले जोरदार स्वागत,दिवसभर झालेले दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम,आणि प्रत्येक लेकींचा माहेरच्यानकडून झालेला अनोखा सन्मान असा मोठा प्रेमाचा खजिनाच लेकींना यानिमित्ताने माहेरकडून मिळाल्याने ही खजिन्याची शिदोरी घेऊन या लेकीं सासरी मार्गस्थ झाल्यात.या सोहळ्याची जय्यत तयारी अमळनेरात करण्यात आली होती. लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यलयात माहेरवाशीन नावाने हा स्नेह मेळा दि.25 डिसेंबर रोजी पार पडला.यानिमीत्ताने अमळनेर च्या वाणी समाजातील ज्या कन्या विवाहानंतर सासरी गेलेल्या सुमारे 300 पेक्षा अधिक कन्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विविध गावाहून आपल्या माहेरी दाखल झाल्या होत्या.
रस्तेही फुलले लेकींच्या सवाद्य मिरवणुकीने
या स्नेह मेळ्याचे प्रमुख वैशिट्य ठरले ते लेकींची सवाद्य मिरवणूक,अमळनेरचे ग्रामदैवत संत सखाराम महाराज वाडी संस्थांनातुन सकाळी 8 वा हिरव्या पैठणी व फेटे परिधान करून लेकींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली,एकाचवेळी शेकडो लेकींच्या मिरवणुकीने रस्तेही फुलल्याचे चित्र निर्माण झाले होते, कार्यालयात आल्यानंतर सर्वाचे औक्षण फुलाच्या पाकळ्यांनी होऊन माहेरी आल्याचे स्वागत करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अ भा वाणी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष सुनिल नेरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वाणी समाज प्रबोधन संस्थेचे विवाह अध्यक्ष रवींद्र मालपुरे,प्रदेश कार्यवाह अजय कासोदेकर,चैतन्यदीप पुणे च्या संपादिका जयश्री येवले,विवाह संस्कृतीच्या सौ रेखा कोतकर,उद्योजिका,सौ सरिता चितोडकर आणि कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून गोदामाईच्या काठावरचे पत्रलेखक दत्ता कोठावदे आणि अभिनेत्री ऋतुजा अमृतकर उपस्थित होते.
मान्यवरांनी या अनोख्या सोहळ्याचे तोंडभरून कौतुक करत महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे आवर्जून सांगितले.उदघाटन सोहळ्या नंतर लेकींच्या कलागुणांना वाव म्हणुन विविध कार्यक्रम पार पडले,लेकीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मनाला भावतील अश्या छोट्या नाटिका सादर झाल्यात,सर्व सणांचे उत्कृष्ठ सादरीकरण झाले,विवाह पद्धतीबाबत ही सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला,लेकींना मायेची ऊब देणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने कार्यालयात अतिशय उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती,या सोहळ्याने लेकीं तर सुखावल्याच मात्र आपल्या लेकींचा सन्मान पाहून त्यांचे कुटुंब देखील भारावले होते.जाताना खरे आनंदाश्रु ढाळत प्रत्येक लेकीने माहेच्यांचा निरोप घेतला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुयोग महीला मंडळाच्या अध्यक्षा मंगला ब्राम्हणकार,सेक्रेटरी पुष्पा भामरे ,उपाध्यक्षा शकुंतला येवले तसेच छाया कोठावदे ,पुष्पा नेरकर,वर्षा कुडे,रेखा मोराणकर,उज्वला शिरोडे,रेखा मार्कडें ,जयश्री येवले ,ममता अमृतकार,अर्चना तलवारे ,शारदा कोठावदे,रजनी केले व कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले.तर या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून दिल्याबद्दल सुनिल भामरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी ला.वा. पंच मंडळ अमळनेर,सविता नावरकर पुणे व सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.