चित्रपटगृह पहिल्याच दिवशी नवीन चित्रपट अभावी बंदच

पुढील शुक्रवारपासून चित्रपटगृह सुरु होण्याची शक्यता
चित्रपटगृह पहिल्याच दिवशी नवीन चित्रपट अभावी बंदच

चाळीसगाव | प्रतिनिधी chalisgaon

राज्यातील कंटेमेंट झोन बाहेरील चित्रपटगृहे पाच नोंव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच दिला आहे. परंतू चाळीसगाव येथील हंस व राज चित्रपटगृह पहिल्या दिवशी शुक्रवारी कुठलाही नवीन चित्रपट नसल्यामुळे बंदच होती. मात्र पुढील शुक्रवारपासून हे चित्रपटगृह...

नवीन चित्रपट येणार असल्यामुळे सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चाळीसगाव येथील आधि घरघर लागलेले हंस व राज चित्रपटगृह कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे मार्च पासून बंद आहेत. मोबाईल व सोशल मिडियामुळे आधिच डबगाई गेलेला चित्रपटगृहांचा व्यवसायीकांचे लॉकडाऊनमुळे पूर्णता; कबरडे मोडले आहे. गेल्याच सहा महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांच्या मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मनोरंजन क्षेत्र खुले करण्याची मागणी सातत्याने केली जात असताना, पाच नोव्हेंबरपासून चित्रपटगृह खुले ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. परंतू पहिल्या दिवशी शुक्रवारी कुठलाही नवीन चित्रपट न आल्यामुळे शुक्रवारी येथील हंस व राज चित्रपटगृहे बंद होती. तसेच जिह्यातील इतर ठिकाणचीही चित्रपटगृह बंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील शुक्रवारी म्हणजे दिवाळीत ( १३ नोव्हेंबर २०२०) सुरज पे मंगल भारी , खाली पीली, लक्ष्मी आदि नवीन चित्रपट येण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा नव्याने येथील चित्रपटगृह सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजुनही तरी चित्रपटगृहात सिनेमा पाहण्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकाना एक आठवड्याची वाट पाहवी लागणार आहे.

चित्रपटगृह सुरु करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा अत्यंत आनंददायी आहे. परंतू शुक्रवारी कुठलाही नवीन चित्रपट नसल्यामुळे आम्ही चित्रपटगृह बंद ठेवले आहे. पुढील शुक्रवारी नवीन चित्रपट येणार असल्यामुळे आम्ही चित्रपटगृह सुरु करण्याची निर्णय घेवू, गेल्या सहा महिन्यांपासून आमची आर्थिक गणित पूर्णता; कोलमडले आहे. परंतू आता चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णयामुळे आम्हाला धीर आला आहे.

राजेंद्र इंगले व्यवस्थापक, हंस व राज चित्रपटगृह

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com