केंद्र सरकार कांद्याची निर्यात बंदी उठवत नाही तो पर्यंत आमदार खासदारांना गाव बंदी करा !

शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन
केंद्र सरकार कांद्याची निर्यात बंदी उठवत नाही
तो पर्यंत आमदार खासदारांना गाव बंदी करा !

चोपडा Chopda ( प्रतिनिधी )

कांद्यावरील (onions) निर्यात बंदी (Export ban) उठविण्यासाठी आमदार खासदार जो पर्यंत शेतकऱ्यांसाठी विधानसभेत (Legislative Assembly) व संसदेत (Parliament) आवाज उठवत नाही तो पर्यंत आमदार, खासदारांना गाव बंदी (Village ban) घातली पाहिजे तरच कांद्या ची निर्यात होऊन कांदा उत्पादक (onion growers) शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार नाही. परंतू निवडून गेलेले सर्वपक्षीय आमदार व खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देऊन त्यांना वाऱ्यावर सोडतात म्हणून आमदार,खासदारांना अगोदर गाव बंदी करा ! त्या शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते (Farmers Association leaders) तथा उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील (President Sandeep Patil) यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

कांदा उत्पादक (onion growers) शेतकऱ्यांनी अवाजवी खर्च करून कांद्याची लागवड केली.यावर्षी कांद्याचे उत्पन्न देखील भरघोस निघत असतांना केंद्र सरकारच्या (Central Government) आयात निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत (trouble) आला आहे.यंदा देशात भरपूर प्रमाणात कांद्याचे उत्पन्न येईल अस कृषी विभागाने (Department of Agriculture) अगोदरच सांगितले होते.त्याची केंद्र सरकारने दखल न घेता उलट कांद्याची निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.

आज बाजार समिती मध्ये कांदा दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलने विक्री होत असल्याने कांदा उत्पादक (onion growers) शेतकऱ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत.शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कुणीही पुढे येत नाही.निवडणुकीत आमदार,खासदारकीची निवडणूक लढविणारे सर्वपक्षीय उमेदवार वारंवार शेतकऱ्यांच्या घरी येऊन पाया पडून मते मागतात.

मात्र शेतकरी रडत असतांना त्याला कोणीही विचारत नाही ही खरी शोकांतिका आहे.केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे कांद्याचे भाव पडले आहेत.मात्र कांदा उत्पादक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देऊन पुढील खरीप हंगामाच्या (kharif season) तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार व खासदार विधानसभेत व संसदेत जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून देतात.

मात्र शेतकऱ्यां च्या मुलभूत प्रश्नांना बगल देऊन वाऱ्यावर सोडले जाते हा प्रकार खपवून न घेता जो पर्यंत आमदार व खासदार कांद्यावरील निर्यात बंदी उठवित नाही तो पर्यंत यांना गाव बंदी करा ! असे आवाहन शेतकरी संघटनेच्या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना द्वारे केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com