जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने केला वडिलांचा खून

रावेर तालुक्यातील घटना
जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने केला वडिलांचा खून
Crime

रावेर|Raver| -

जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची घटना सोमवारी दि.२९ सायंकाळी पाल (ता.रावेर) येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.

Crime
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

पाल (ता.रावेर) येथे गट शेत शिवार गट नंबर २७१ शेतात अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) हा रहात होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी त्यांचा मुलगा दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला (वय २६) यास जेवण करून घेण्यास सांगितले. यावेळी दिनेशने काय केले आहे असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले.
उडीद दाळ व भाकरी केल्याचा राग येऊन दिनेशने वडील व बहीणीस चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचे वडील तेथून पळून जात असतांना दिनेश याने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले.

याबाबत बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन नवले व पोलीस करीत आहेत.

संशयीतास अटक
दरम्यान सदरची घटना समजताच विभागीय पोलीस अधिकारी श्री. लवांडे, सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलीस निरिक्षक मनोहर जाधव व पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संशयीत दिनेश उर्फ शिवा यास पोलीसांनी अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com