३६ तासानतंर सापडला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह

शोध घेण्यास मेहुणबारे पोलीस व शोध पथकाला यश
३६ तासानतंर सापडला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

मन्याड धरणा (Manyad Dam) खालील काल पाण्यात पडलेल्या तरुणाचा शोध घेण्यास पोलीस (police) व शोध पथकाला यश आले असून तब्बल ३६ तासानंतर त्याच्या मृतदेह नांद्रा गावाजवळील नदीपात्रात (river) मिळुन आला आहे. धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने तरुणाचा मृतदेह वाहुन नाद्रा गावाजवळ आला.

चाळीसगाव सध्या मन्याड आणि गिरणा ही दोन्ही धरण पाण्याने पूर्णपणे भरली असून मोठ्या प्रमाणावर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग नदीपात्रातून होत असल्याने हा प्रसंग पाहण्यासाठी या दोन्ही धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच काल चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील विकी संजय पाटील (वय २४) हा विवाहित तरुण पिलखोड गावापासून जवळ असलेले मन्याड धरण पाहण्यासाठी गेला असताना काल दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास धरणाच्या खालील भागात होत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात पाय घसरून पडला कालपासून ते आज दुपारपर्यंत या तरुणाचा शोध घेण्याचे कार्य मेहुणबार पोलिसांच्या पथकासह मालेगाव आणि चाळीसगाव येथूनही दोन पथके घटनास्थळावर शोध घेत होते.

आज तब्बल ३६ तासांतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह नांद्रा गावाजवळील नदीपात्रात आढळुन आल्याची माहिती मिळाली आहे. मयत तरुण हा धरणातून बाहेर पडणार्‍या पाण्याच्या जोराचा प्रवाहात वाहत आला. विकी पाटील या तरुणाचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झालेले असून त्याला तीन महिन्यांची एक मुलगी आहे. त्याचे पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मेहुनबारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड हवालदार मिलिंद शिंदे, पोलीस नायक गोरख चकोर यांच्यासह पथकाने तरुणाचा शोध घेतला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com