उड्डाणपुलाजवळील ट्रॅकवर आढळला बालकाचा मृतदेह

शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
उड्डाणपुलाजवळील ट्रॅकवर आढळला बालकाचा मृतदेह

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील शिवाजीनगर (Shivajinagar) रेल्वे उड्डाण पुलाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ (Near Railway Flyover) मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एका शालमध्ये दोन महिन्याच्या (two month old baby) बालकाचा मयतस्थितीत बेवारसरित्या (uninherited) मृतदेह (dead body)आढळूल आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अंदाजे दोन महिन्यचे बालकाचा बेवारसरित्या मृतदेह आढळूल आला. याठिकाणी कचरा वेचण्यसाठी गेलेल्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याने तात्काळ परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली.

ही वार्ताशिवाजी नगर परिसरात वार्‍यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी, प्रफुल्ल धांडे, पोना ललीत भदाणे यांच्यासह इतर पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेवून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला.शहर पोलीस ठाण्यात

अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.औषधी, दुधाच्या बाटलीसह कपडे फेकले बालकाच्या मृतदेहाजवळ कपडे, औषधी, काळा दोरा, दुध पिण्याची बाटली अश्या वस्तू आढळून आल्या.

दरम्यान, बालकाचा मृत्यू कसा झाला, कुणी फेकले, त्याचे पालक कोण याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसून पोलिस त्याचा तपास करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com