जिल्ह्यात हत्यांचे सत्र थांबेना ; मुक्ताईनगर तालुक्यात आढळला महिलेचा मृतदेह

जिल्ह्यात हत्यांचे सत्र थांबेना ; मुक्ताईनगर तालुक्यात आढळला महिलेचा मृतदेह

मुक्ताईनगर - Muktainagar

जळगाव (jalgaon) जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात एका पाठोपाठ एक हत्येच्या (murder) घटना घडत असून या घटनांमुळे जिल्हा हादरला आहे. हे सत्र सुरूच असून आजही मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर (Berhanpur Highway) संत मुक्ताई साखर कारखान्याच्या (Sant Muktai Sugar Factory) पुढे कुंड गावाजवळ असलेल्या पुलाच्या खाली महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून याठिकाणी टाकून दिल्याचे आढळून आले. सदर महिलेची ओळख अद्याप पटली नसून तपास कार्य सुरू आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर असणाऱ्या पूर्णा नदी पात्राच्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडालेली असून अतिशय क्रूरपणे हत्या करुन त्या महिलेचा मृतदेह हा जाड (कृषी संबंधीत कंपनीचा शिक्का असलेल्या) प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकण्यात आले असून डोक्याला जबर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या संदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील पोलीस पाटील संदीप इंगळे यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिली असून त्यावरून अकस्मात कृतीची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे करीत आहेत दरम्यान या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुकाही हादरला असून जळगाव जिल्ह्यातील खुनाची मालिका कधी बंद होणार ? पोलीस प्रशासनासमोर हे आव्हान बनले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com