इच्छापूर येथील हरवलेल्या बालिकेचा मृतदेह विहिरीत आढळला

इच्छापूर येथील हरवलेल्या बालिकेचा मृतदेह विहिरीत आढळला

सोशल मीडियात नेटकऱ्यानी बालिकेला शोधण्याचे केले होते आवाहन

रावेर| Raver प्रतिनिधी-

मध्यप्रदेशातील इच्छापूर (Ichchapur) येथे २ वर्षीय बालिका हरवल्याची (missing girl) घटना दि.२३ गुरुवारी घडली होती. या बालिकेचा शोध सुरु असतांना दि.२५ रोजी तिचा मृतदेह (Corpses) घराजवळील विहिरीत (well) आढळून आल्याने,यापरिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. ख़ुशी नाव असलेली हि बालिका हरवल्यावर संपूर्ण पंचक्रोशीत शोध घेतला जात होता. त्याबाबत रावेरात सुद्धा सोशल मीडियात आवाहन होत होते. अखेर तिचा मृतदेह मिळून आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.याबाबत समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून,या घटनेतील मुख्य आरोपी शोधून काढण्याचे आव्हान मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) शहापूर पोलिसांना (Shahapur Police) आहे.

दि.२३ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास माळीवाड्यातील दोन वर्षीय ख़ुशी उर्फ रुषाली दिलीप माळी हि चिमुकली खेळत असतांना घरासमोरून अचानक गायब झाली होती.याबाबत शहापूर म.प्र.पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.१५ पोलिसांचे पथक या शोध कार्यात लावले होते.दरम्यान दि.२५ रोजी ख़ुशीचे वडील दिलीप माळी यांच्या घरापासून अवघ्या २०० फुटावर असलेल्या विहिरीतून दुर्गधी सुटल्याने,पोलिसांनी या ठिकाणी शोध घेतला असतांना एका गोणीत मृतदेह मिळून आला.

मृतदेह काळा पडलेला व रक्ताने माखलेला असल्याने शनिवारी रात्री बऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.याठिकाणी डॉ गौरव थकानी,डॉ.प्रदीप चौधरी,डॉ.विक्की चौकसे,डॉ.सुरभी शहा यांच्या टीमने शव विच्छेदन केले.त्यात ख़ुशी हिचा गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.तर तिच्या सोबत अनुचित प्रकार घडला असल्याची शंका असल्याने त्याबाबत देखील शक्यता पडताळून पहिली जात आहे.या गुन्ह्याचा तपास सुरु असून लवकरात लवकर आरोपीचा छडा लावण्यात येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक राहुलकुमार लोढा व्यक्त करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com