बेल वाजली, वर्ग भरला आणि सुरू झाली "मस्ती की पाठशाला"

निंभोरा येथील १९८८ च्या बॅच चे गेट टूगेदर, 33 वर्षांनी ४५ मित्रमैत्रिणीनी जागवल्या स्मृती
बेल वाजली, वर्ग भरला आणि सुरू झाली "मस्ती की पाठशाला"

निंभोरा (Nimbhora) बु।। ता.रावेर,(वार्ताहर)

येथील न्यु इंग्लिश स्कूल (New English School) निंभोरा येथील 10 च्या अ .ब .क या तिन्ही तुकडीचे 1988 च्या बॅचचे विद्यार्थ्यांनी (students) एकत्र येऊन शाळेत स्नेह मेळाव्याचे (Meet the affections) आयोजन केले होते.

ए.एच. वारके सर,बी. डी. वारके सर, ए.एन. चौधरी सर , बाळू शिपी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली. बी.डी. वारके यांनी सरवस्तीच्या मूर्तीची पुजा करुन कार्यक्रमाला सुरवात केली. आपण कितीही मोठे झालो वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही. सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत. म्हणुन म्हणतात आनंद आनंदी गडे इकडे तिकडे चोही कडे तरीही निंभोरा येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या १९८८च्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल तीस वर्षांनी पुन्हा जागवल्या.

लॉकडाऊनच्या काळात डिगंबर नेहेते व राजू गुरव यांनी या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला. अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि डिगंबर नेहेते राजू गुरव अनिल बोरनारे‘ व रविंद्र ठाकरे यांनी गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली आणि दिवस ठरला रविवार, २६ डिसेंबर.

सकाळपासूनच शाळेचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते. मुंबई पुणे नाशिक व दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते. सर्व जण शिक्षकांसोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले. शाळेत असताना व्हायची तशी घंटा वाजली. सर्व जण एका रांगेत उभे राहिले. आणि वर्गात गेले. तेव्हाचे शिक्षक वारके सर हजेरी घेतली. पुन्हा शाळेच्या आवारात सजलेल्या मंडपात आले. स्वर्गवासी झालेल्या काही मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिगंबर नेहेते व राजू गुरव यांनी केले. उपस्थित असलेलले शिक्षक वारके सर, चौधरी सर यांचा सन्मान शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय सैन्यदलातुन निवृत्त झालेल्या नितीन बऱ्हाटे या वर्गमित्राचाही सन्मान करण्यात आला. एकमेकांशी परिचय व्हावा यासाठी उपस्थित असलेल्या ४५ वर्गमित्रांनी आपल्या कुटुंबियांसोबत विस्तृत परिचय दिला. शिक्षकांसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला. नंतर सुरू झाली मस्ती की पाठशाला. या पाठशाळेला अनिल बोरनारे यांनी गेलेल्या "छु कर मेरे मनको" या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. रवी ठाकरे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांची फक्त लढा म्हणा या कवितेचे सादरीकरण केले. छगन नेहेते याच्या शेरो शयरीला सर्वांनी दाद दिली. वासंती ढाके, रंजना महाजन, कल्पना बोरनारे, सतीश चौधरी, श्रीकांत भुयार, निवृत्ती चौधरी, छाया सोनार आदी अनेक मित्रांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या.

तब्बल तीस वर्षांनंतर भरलेल्या या वर्गाची तिथेच मधली सुट्टी झाली; पण त्यानंतर शेवटचे तासही खेळण्या-बागडण्यात कधी गेले ते कळलेच नाही. पुन्हा एकदा भेटायचे वचन एकमेकांना देत हायस्कूलचा तो एक अनोखा दिवस सरला होता. अनिल बोरनारे यांनी केलेल्या बहारदार सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com