चाळीसगावात गणपती बाप्पांच्या आगमनाची धूम

गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात बाजारात चैतन्य
चाळीसगावात गणपती बाप्पांच्या आगमनाची धूम

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोनामुळेे गेल्या दोन वर्षांपासून गणपतीच्या उत्सवाला निर्बंध लादण्यात आले होते. यंदा मात्र पूर्णपणे निर्बंध हटविल्यामुळेे चाळीसगाव परिसरात गणपती बाप्पांच्या (Ganapati Bappa) आगमनाची धुम दिसून येत आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी बाजारात (market) गणपती मुर्ती व पूजा साहित्य (Ganapati idols and worship materials) घेण्यासाठी नागरिकांची (citizens) एकच गर्दी (crowd) दिसून आली.

काही बालगोपाल मंडळातील कार्यकर्ते देखील आपल्या लाडक्या गणरायाला आदल्या दिवशीच वाजत गाजत घेवून जाताना दिसून आले. तर काही जण कुटुंबासह गणपतीच्या मुर्ती पसंत करती होते. यंदा कोरोनांचे निर्बंध हटल्यामुळेे बाजारात गणपती सणाचा उत्साह दिसून येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात बाजरात चैतन्य निर्माण झाले आहे. येथील तहसील कचेरीपरिसरात गणपती मुर्त्या व पूजा साहित्यांची मोेठ्या प्रामाणात दुकाने थाटण्यात आलेली आहेत. यंदा बाजारात गणेशाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या आकर्षक मुर्त्या दिसून येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com