राष्ट्रीय मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल सात उमेदवारांचे अर्ज नामंजुर

१९ जागांसाठी १७५ अर्ज, आता लक्ष माघारीकडे, माघारीसाठी लॉबींग सुरु
राष्ट्रीय मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल सात उमेदवारांचे अर्ज नामंजुर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या (National Board of Co-operative Education board) निवडणूकीसाठी (election) १८२ उमेदवारांनी अर्ज दाखल (Candidates apply) केले होते. शनिवारी छाननीत (under scrutiny) तब्बल सात अर्ज नामंजुर (Seven applications rejected) करण्यात आले. नामजुर अर्जांमध्ये ज्यांनी अनेक निवडणुका लढल्या व जिंकल्या आशा दोन उमेदवारांचा देखील समावेश आहे. आता हे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यासाठी न्यायालयात (court) जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीसाठी १७५ उमेदवार रिंगणात असून माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर माघारीसाठी आतापासून लॉबींग केली (Lobbying for withdrawal) जात असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्जांचा अक्षरशा; पाऊस पडला. शेवटच्या दिवसा अखेर १८२ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननी अर्जात ७ अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत.

संस्थेचे ३३४३ इतके सभासद आहेत, आणि संचालक मंडळाची संख्या १९ इतकी आहे. मात्र दाखल उमेदवारांची संख्या आजच्या घडीला १७५ इतकी झाली आहे. हे पाहता संस्थेच्या निवडणुकीत दोन पेक्षा अधिक पॅनल मैदानात उतरतील असे चित्र आहे. आता सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले असून त्यानतंर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

याचे झाले अर्ज नामजुर-

प्रमोद पांडुरंग पाटील, चंद्रकांत चितामण वाणी, अजय गोपाळराव देशमुख, मिलींद नमादेव जाधव, विठ्ठल अंबदास शिंगाडे यांच्यासह रविंद्र चुडामण पाटील यांचे दोन्ही गटातील अर्ज नामंजुर झाले आहेत. आता तब्बल १७५ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com