विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना विशेष गौरव पुरस्कार

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना विशेष गौरव पुरस्कार
USER

जळगाव - jalgaon

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार (Environment Award) मिळवणारे आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इ.10 वी व इ.12 वी बोर्डात 900 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आयआयटी (IIT), आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना विशेष गौरव पुरस्कार
जिल्ह्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नेमणुका

या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी पाल्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयात (District Military Office) उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी 20 सप्टेंबर,2022 पर्यंत कार्यालयात संपर्क साधावा.

ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावेत.

या संधीचा जास्तीत जास्त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com