अँबिस प्रणालीत राज्यातील 6 लाख 500 हजार गुन्हेगारांची माहिती संकलित

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते प्रणालीचा शुभारंभ
अँबिस प्रणालीत राज्यातील 6 लाख 500 हजार गुन्हेगारांची माहिती संकलित

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

अँबिस संगणकीय प्रणालीमध्ये (Ambis computer system) आरोपींच्या बोटांची ठसे (Fingerprints of the accused) पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, फोटो, डोळ्यांचे बुबुळे हे सर्व डिजिटल स्वरूपात जतन (Saved in digital format) करून गुन्ह्यात ठसे मॅचिंग करण्याची क्षमता आहे. या प्रणालीमध्ये जवळपास 6 लाख 500 हजार गुन्हेगार व शिक्षापात्र आरोपींची माहिती (Information of criminals and convicts) संगणिकृत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांनी अँबिस प्रणालीच्या उद्घाटनाप्रसंगी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात (District Superintendent of Police Office) अंगुली मुद्रा (Finger print) कार्यालयातील ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (Automated multi-model biometric identification system) अर्थात (अँबिस) या संगणकीय प्रणालीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन डोंगरे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बारी, अशोक महाजन, पोहेकॉ जयंत चौधरी, विनायक पाटील, किशोर मोरे, सचिन चौधरी यांनी परिश्रम घेतले.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे

गुन्हेगाराचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी होणार वापर सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत यापुर्वी अटक केलेल्या सर्व आरोपींचे सर्व ठशांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वइतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार असलयाची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बोलताना दिली.

पोलीस ठाण्यातील संगणकीय प्रणालीशी जोडणार

संगणकीय प्रणाली राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य देशात पहिले ठरले असून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या संगणकीय प्रणाली (Computer system) राबविण्यात येणार आहे. अँबिस प्रणाली ही पोलीस विभागात वापरण्यात येणाच्या इतर संगणकीय प्रणालीशी जोडले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com