जळगावात एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच

जळगावात एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

एस.टी. महामंडळाला (S.T. Merger) शासनात (government) विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरात एस.टी.कर्मचार्‍यांचा बेमुदत संप (strike of ST employees) सुरु आहे. जळगावात एस.टी कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. या संपावर तोडगा निघावा या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी एस.टी. कर्मचार्‍यांच्या संघटनांसोबत (S.T. Employees' unions) बैठक घेतली. या बैठकीनंतरही बस कर्मचारी विलीनकरणाच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे जळगावातील एस.टी. कर्मचार्‍यांचा(ST in Jalgaon Employees) संप सुरु (strike begins) आहे.

दोन महिन्यांपासून एस.टी.कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. शासनाकडून संपकरी कर्मचार्‍यावर कारवाई सुध्दा करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारीही कामावर रुजू झालेले नाही. काही कर्मचारी कामावर रुजू झाले असले तरी बससेवा पूर्ववत झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी एस.टी. कर्मचार्‍यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

यात शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सातवा वेतन आयोग देण्याचे आश्वासनही याबैठकीत पवार यांनी दिले. संघटनांनी कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचे आवाहन सुध्दा केले आहे. मात्र यानंतरही कर्मचारी आपल्या विलीनकरणाच्या मागणीवर ठाम आहे. विलीनीकरण नाही तोपर्यंत संप मागे नाही.

त्यामुळे जळगाव आगारातही संप सुरु आहेत. कुणीही कर्मचार्‍यांनी संपातून माघार घेतलेली नाही व कामावर रूजू झालेले नाही. असे संपकरी विनोद पाटील यांनी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com