खंडाळ्यातील तलावाचे बुडीत क्षेत्र लाटण्यार्‍याकडे प्रशासनाने दुर्लक्ष

ना पाटबंधारे, ना महसूल विभागाची कार्यवाही : नावालाच झाला पंचनामा : गावकर्‍यांचा उपोषणाचा इशारा
खंडाळ्यातील तलावाचे बुडीत क्षेत्र लाटण्यार्‍याकडे प्रशासनाने दुर्लक्ष

खंडाळा (kHANDALA) , ता. भुसावळ (वार्ताहर) -

येथील तलावाच्या (Khandala lake) बुडीत क्षेत्रात कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याने शेतीच्या नावने जवळपास तीन एकर जमिनीवर कब्जा (Occupy the land) मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत संबंधितांकडे ग्रामस्थांनी तक्रार करुन अद्याप ही कारवाई (Action) करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थानी (Villager) उपोषणाचा इशारा दिला आहे.

येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याने शेतीच्या नावाखाली शेत जमीन तयार करून घेतली असून लाखो टन मुरूमचे अवैध रीतीने उत्खनन केले आहे. तरी आठ दिवस उलटून ही संबंधित पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) आजपर्यंत काही ही कार्यवाही केली नसून पाटबंधारे विभागाकडून तलावाची जमीन लाटण्यार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍याला पाठीशी घालत आहे असा प्रश्न गावकर्‍यांना पडला असून ‘दाल मै कुछ काला तो नही..?’ की पाटबंधारे विभागाने हे प्रकरण परस्पर दाबून तर घेतलं नाही...? कार्यवाही करायला का उशीर होत आहे...? असे जर सामान्य शेतकर्‍यांनी तीन एकर जमीन लाटली असती तर...? त्याला शिक्षा झाली असती का.? का त्या शेतकर्‍यांला पाटबंधारे विभागाने असेच पाठीशी घातले असते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


लाखो टन मुरूमाचा भलामोठा चार फूट उंचीचा बंधारा टाकला आहे. पाच दिवसापूर्वी महसूल विभागाने जागेवर जाऊन पंचनामा (Panchnama) केला. त्यात पंधरा ते वीस ब्रास अवैध रीत्या महसूल विभागाला कोणत्याही प्रकारची माहिती व पूर्वकल्पना न देता या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांने मुरूम लाटला. तलाठी, महसूल विभागाचे (Revenue Department) कर्मचारी आले पंचनामा केला तरी अद्यापपर्यंत कार्यवाही तर दुरच साधं बोलवन सुद्धा झाले नाही हा पंचनामा फक्त कागदावरच झाला की काय..? का या मध्ये पण काही गौडबंगाल आहे का? महसूल विभाग पण या जमीन लाटणार्‍या सेवानिवृत्त कृषी विभागाच्या कर्मचार्‍याला अभय तर देत नाही ना.? अशी चर्चा गावकर्‍यांमध्ये होत आहे.

या तलावाच्या बुडीत क्षेत्रातील तीन एकर जमीन लटणार्‍या व महसूल विभागाच्या अवैध रितीने मुरूम चोरणार्‍या सेवानिवृत्त कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांवर लवकर संबंधित पाटबंधारे विभाग व महसूल विभाग ने संयुक्त कार्यवाही करावी अन्यथा गावकर्‍यांनी उपोषणाला बसणार असल्याचा असा इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com