काशी एक्सप्रेसचा अपघात टळला

एसी डब्यात होते 70 प्रवासी : डब्याच्या चाकात झाली होती खराबी
काशी एक्सप्रेसचा अपघात टळला

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकावर कार्यरत रेल्वे कर्मचार्‍यांच्या (railway employees) सतर्कतेमुळे (Due to vigilance) काशी एक्सप्रेसचा (Kashi Express) अपघात (accident) टळल्याची घटना 18 रोजी घडली. यानंतर सदर वातानुकुलीत डब्यातील (air-conditioned coaches) प्रवाशांना (Passengers) साधारण डब्यातून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. रेल्वे कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखविल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्र. 15017 डाऊन काशी एक्सप्रेस दुपारी 2 वाजेच्या सुमारास गाडी येथील रेल्वे स्थानकाच्या (Railway station) फलाट क्र,.5 वर दाखल झाली. यावेळी रेल्वे स्थानकावर कार्यरत सी.अँड डब्ल्यू स्टाफचे एमसीएम बनराज मीना (MCM Banraj Meena of C&W Staff), संतोष ढोके यांनी गाडीचा वातानुकुलीत डबा बी-2 च्या चाकातून आवाज (sound from the wheel) येत असल्यामुळे त्यांनी गाडी थांबताच त्या डब्याच्या चाकांची पहाणी केली असता चाक प्रसरण पाऊन पसरट झाले होते. त्यामुळे चाकाचा अवाज येत होता. यामुळे काशी एक्सप्रेसला मार्गात अपघात (accident) होण्याची शक्यता होती. दोन्ही कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखविल्यानंतर स्थानक व्यवसापकांसह (Station Manager) स्थानक संचालक अय्यर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य केले. मात्र संबंधित कोच हा वातानुकुलीत होता. व येथे वातानुकुलीत कोच उपलब्ध नसल्याने या डब्यातील प्रवाशांसाठी साधारण डबा उपलब्ध करुन देण्यात आला.

प्रवाशांची समजुत

स्थानक संचालक अय्यर यांनी यांच्या सह अधिकारी यांनी प्रवाशांना या डब्यातून खाली उतरविले व डबा गाडी पासून वेगळा केला. दरम्यान, येथील रेल्वे प्रशासनाकडे वातानुकुलीत डबा उपलब्ध नसल्यामुळे या प्रवाशांसाठी साधारण डब्याची व्यवस्था (Ordinary coach arrangement) करण्यात आली. यावेळी अधिकार्‍यांनी प्रवाशांना परिस्थितीची जाणीव करु देत समाधानकारक उत्तरे देऊन दुसरा पर्याय नसल्याचे सांगून समजूत काढली.

तसेच ज्यांना जायचे नाही त्यांना पुढील तिकिटाच्या रक्कमेचा परतावा मिळेल तसेच प्रवास करणार्‍या प्रवाशांना भुसावळ पासूनच्या पुढील तिकिटाच्या रक्कमेचा परतावा (Refund) परत मिळणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर प्रवाशांनी याच गाडीतून जाण्याचे पसंत केले. त्यानंतर सायंकाळी 5 .10 मिनिटांनी काशी एक्सप्रेस (Kashi Express) पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या डब्यातून तब्बल 70 प्रवासी प्रवास करत होते. काशी एक्सप्रेस दुपारी 2 वाजता येथील स्थानकावरील फलाट क्र. 5 वर दाखल झाली होती, त्यानंतर तात्काळ बी.-2 या डब्यावर काम करण्यात आले. सायंकायी 5.10 वाजता ही गाडी रवाना करण्यात आली.

नवीनच डब्याचा चाका बाबत प्रश्न

सदर गाडीचा बी-2 हा कोच नवीनच कार्यान्वित करण्यात आलेला एलएचबी कोच(LHB coach) होता. मात्र नवीन डब्याचे चाक कसे प्रसरण पावले. याबाबात प्रश्न उपस्थित होत आहे. या चाकाच्या धातू, लोखंडाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

दुर्घटना टळली

रेल्वे कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या डब्यातील 70 प्रवाशांसह काशी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍यार अनेक प्रवाशानचे प्राण वाचले व रेल्वेचा मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वे प्रवाशांसह अधिकार्‍यांना दिलासा मिळाला.

प्रवाशांचा उकाड्यातून प्रवास

दरम्यान बी -2 या वातानुकलीत डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना पुढील प्रवासाच्या भाड्यातील रक्कमेचा परतावा मिळणार असला तरी कडक उन्हाळ्यात वातानुकुलीत डब्यातून प्रवास करण्याचा मनसुबा असलेल्या प्रवाशांना मात्र या गाडीच्या जनरल डब्यातून प्रवास करावा लागला त्यामुळे त्यांना प्रवासात उकाडा सहन करावा लागला आहे.

Related Stories

No stories found.