
रावेर|प्रतिनिधी raver
बहिण-भावाचे अतूट नाते असते.आई-वडील यांच्यानंतर बहिणीलाच भावाची चिंता असते,हे नात जन्मोजन्मच आहे. अहिरवाडी (ता.रावेर) येथे ८८ वर्षाच्या वृद्धाचे रक्षाबंधनाच्या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र बहिणीची आशा भोळी असते, यावेळी ८३ वर्षाच्या बहिणीने, मयत झालेल्या वृद्धाच्या मनगटावर राखी बांधून भाऊरायला अखेरचा निरोप दिला.याघटनेने उपस्थित नातलगाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.
येथील बाबुराव गरबड महाजन (पवार) वय-८८ यांचे दि.३० रोजी पहाटे २.१५ मी.वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा निघण्यापूर्वी त्यांच्या भगिनी यशोदाबाई कडू महाजन (वय-८३) यांनी भावाला शेवटचे रक्षाबंधन म्हणून ओवाळणी करून राखी बांधली.हा प्रसंग पाहून उपस्थित नातलगांचा देखील उर दाटून आला होते.ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हि घटना घडलेली असल्याने भाऊ बहिणीचे प्रेम पाहून उपस्थित नातलग भावनाविवश झाले होते.मयत बाबुराव गायकवाड यांच्या पश्चात सुधाकर व बाळू महाजन मुल आहे.ते रावेर येथील माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांचे चुलत काका होते.