बर्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील किनगाव जवळील" तो खड्डा "तरूणांनी श्रमदानातून बुजला

बर्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील किनगाव जवळील" तो खड्डा "तरूणांनी श्रमदानातून  बुजला

चिंचोली Chincholi ता यावल :--

बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील (Burhanpur Ankleshwar National Highway) किनगाव जवळ विज मंडळाच्या कार्यालयासमोर (Office of Electricity Board) असलेल्या पुला जवळील (bridge) खड्ड्यांमध्ये काल दि. १७ रोजी रात्री साडेआठ वाजता एरंडोल तालुक्यातील हनुमंत खेडा येथील तरुणाची मोटरसायकल (Young man's motorcycle) खड्ड्यांमध्ये ‌‌ (pits) पडल्याने सदर तरुण जबर जखमी (wounded) झाला होता. याची बांधकाम विभागाने (Construction Department) दखल न (not noticing) घेतल्याने अखेरीस किनगावच्या तरूणांनी (youth) तो खड्डा माती टाकून (pit was filled with soil.) बुजला.

काल दि. १७ रोजी रात्री साडेआठ वाजता एरंडोल तालुक्यातील हनुमंत खेडा येथील तरुणाची मोटरसायकल खड्ड्यांमध्ये ‌‌ पडल्याने सदर तरुण जबर जखमी झाला होता. त्याच्या नाका व कानातुन रक्त वाहू लागले होते. त्या‌ला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या घटनेची दखल तालुक्यातील कोणत्याही अधिकारी व पदाधिकार्‍यांनी घेतलीं नाही.

बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर चिंचोली ते  यावल या १८ कि.मी. रस्त्याची चाळण असे वृत्त दै देशदूत ने १८ रोजी प्रसिद्ध केली होती. रात्रीच सदर तरुणांचा अपघात झाला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून येथील आठ ते दहा तरुणांनी अपघातास कारणीभूत असलेला खड्डा आज खडी माती टाकून तात्पुरता का होईना दुरुस्त करून एक आदर्श निर्माण केला आहे.

यासाठी किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र आबाजी पाटील , विशाल सुभाष पाटील , स्वप्निल महाजन , गजानन गायकवाड , किशोर कोळी ,गौरव कोळी , आदित्य पाटील ,मयुर पाटील ,पप्पु रल  यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com