
जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी भागातील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळाच संपुर्ण यंत्रणा सज्ज होवून त्यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करीत ओलीस ठेवलेल्या कर्मचार्यांना सुरक्षीत बाहेर काढत दहशतवाद्यांचा डाव जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने उधळून लावला. परंतु हा हल्ला नसून जिल्हा पोलीस दलाकडून केले जाणारे प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यानंतर नागरिकांसह कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जिल्हा पोलीस दलाकडून वेळोवेळी प्रात्याक्षिक मोहीम राबविल्या जात असतात. शनिवारी सकाळच्या सुमारास शहरातील एमआयडीसी भागातील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या मुख्य आऊटगेट मधून ट्रक बाहेर जात असताना, अचानक बंदूकधारी चार दहशतवाद्यांनी कंपनीच्या आत प्रवेश केला. दहशतवाद्यांनी कंपनीत प्रवेश करत असताना, त्यांना कंपनीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविले. परंतु दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या वरिष्ठांनी पोलीस अधीक्षक एम.राजकूमार (Superintendent of Police M. Rajkumar) यांना घटनेचीमाहिती दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी दहशतवादी हल्ला विरोधी कारवाईचे आदेश दिले.
दहशतविरोधी पथकासह यंत्रणा घटनास्थळी
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह दहशत विरोधी शाखा, एमआयडीसी पोलीस स्टेशन, बीडीडीएस, श्वान पथक, पोलीस फॉरेंन्सिक युनिट, स्थानिक गुन्हे शाखा, अग्निशमन, रुग्ण वाहिका, जिल्हा रुग्णालय , जिल्हा विशेष शाखा, आय.बी., एसआयडी, प्रांत एटीएसच्या अधिकार्यांनाही घटनास्थळी पाचारण केले.
ओलीस ठेवलेल्यांची सुखरुप सुटका
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपुर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यास. त्यांनी प्रत्येक यंत्रणेतील पथकाने घटनेची माहिती व गांभीर्य जाणून घेवुन आपापली कारवाई केली. त्यात क्युआरटी पथकाने कारवाई करुन ओलीस ठेवलेल्या नागरिक व कर्मचार्यांना सुरक्षित बाहेर नेत त्यांनी सुटका केली.
बीडीडीएसह श्वान पथकाकडून तपासणी
यंत्रणेने आपले कर्तव्य योग्यरित्या बजाविलनंतर बीडीडीएस पथक व श्वान पथकामार्फत संपुर्ण कंपनीची कसून तपासणी करण्यात आली.
अन् कर्मचार्यांनी सोडला सुटकेचा निश्वास
दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच कंपनीतील संपुर्ण कर्मचार्यांसह नागरिक भयभीत झाले होते. कामगारांना घटनेच्या अनुषंगाने सर्व परिस्थिती ही पोलिसांच्या नियंत्रणात असून कोणीही भयभित होवू नये व ही कार्यवाही पोलिसांनी राबविलेली प्रात्यक्षिक असल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.