भुसावळ-जामनेर रस्त्यावर भीषण अपघात ; तीन ठार, एक गंभीर

भुसावळ-जामनेर रस्त्यावर भीषण अपघात ; तीन ठार, एक गंभीर

जळगाव - jalgaon

भुसावळ-जामनेर (Bhusawal-Jamner) रस्त्यावर गोराडखेडा गावा जवळ लाकडाने भरलेले ४०७ वाहन प्रवाशी वाहतुक करणाऱ्या ॲपे रिक्षावर पलटी झाल्याने भीषण (Accident) अपघात घडला. या अपघातात तीनजण जागीच ठार तर एक जण गंभीर असल्याचे वृत्त आहे.

भुसावळहून जामनेरकडे प्रवाशी घेवून जाणाऱ्या ॲपे रीक्षावर ४०७ वाहन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यात रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची स्थिती गंभीर असून आठ ते दहा प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांचेवर शासकीय रूग्णालय जामनेर व जळगाव येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आ.गिरीश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com