भोकरदन तालुक्यात भीषण अपघात ; एरंडोल शहरातील सासू-जावयासह एक ठार

भोकरदन तालुक्यात भीषण अपघात ; एरंडोल शहरातील सासू-जावयासह एक ठार

एरंडोल - प्रतिनिधी Erandol

आज दि.२७ रोजी जालना येथे कुरडई-पापड विक्रीसाठी (Pickup) पिकअप क्र.एम.एच.१९ सी.वाय.१०९१ ने जात असताना (Truck) ट्रक क्र.एम.एच.४० एके ५१५६ ने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.

भोकरदन तालुक्यात भीषण अपघात ; एरंडोल शहरातील सासू-जावयासह एक ठार
Accident ट्रक-एस.टी.बसचा अपघात ; प्रवाशी जखमी

या अपघातात (jalgaon) जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील जावई-सासू व अन्य एक जण यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना भोकरदन (Bhokardan) तालुक्यात घडली.

एरंडोल येथील रामदास रामरतन पाटील, कल्पनाबाई भरत पाटील, कल्पना गोविंदा ठाकूर, सचिन सुखाल पाटील व भारत पाटील हे पाच जण कुरडई-पापड विक्रीचा व्यवसाय करतात. ते मंगळवारी पिकअपमध्ये जालना जाण्यासाठी निघाले. रात्री उशीर झाल्याने भोकरदन तालुक्यातील एका ठिकाणी थांबून त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. सकाळी लवकर उठून जालन्याकडे जाण्यास निघाले व रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

या अपघातात कल्पनाबाई भरत पाटील (वय ४७), रामदास रामरतन पाटील (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला हे दोघं सासू-जावई असल्याची माहिती आहे. तर जालना येथे उपचारासाठी दाखल केलेल्या तिघांपैकी कल्पना गोविंदा ठाकूर (वय ४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर सचिन सुखलाल पाटील (४०) आणि भारत पाटील (५५) यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. पिकअपमधील सर्वजण एरंडोलचे आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली.

Related Stories

No stories found.