जळगावात तेरी मेरी यारी..मग कोणत्या विरोधकांवर तुटून पडणार?

जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या आदेशाने संभ्रमावस्थेत
जळगावात तेरी मेरी यारी..मग कोणत्या विरोधकांवर तुटून पडणार?

चेतन साखरे

जळगाव jalgaon

राज्यातील राजकीय वातावरण (Political atmosphere) लक्षात घेता मुख्यमंत्री (CM) तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी भाजपासह (bjp) विरोधकांवर (opposition) तुटून पडा असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. राज्यात स्थिती काही असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र भाजपा (bjp) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते हे आपसात जुळवून आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोणत्या विरोधकांवर तुटून पडणार? या प्रश्नाने जिल्ह्यातील शिवसैनिक संभ्रमात सापडला आहे.

जळगाव जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2019 ची विधानसभा ही महायुती म्हणून लढविण्यात आली होती. निकालानंतर मात्र राज्यात सत्ता समिकरण बदलले आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेवर आली. त्यामुळे युती करून लढलेल्या भाजपा (bjp) आणि शिवसेनेत (Shiv Sena) मोठे वितुष्ट निर्माण झाले. राज्यभरात ही स्थिती असली तरी याला अपवाद ठरला आहे तो जळगाव जिल्हा.

जळगाव जिल्ह्यात भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Former Minister MLA Girish Mahajan) आणि शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) या दोघांचे ‘तेरी मेरी यारी (Teri meri yaari) मग....गेली दुनीयादारी’ असेच चित्र आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही नेते व्यासपीठावर एकत्र दिसून आले आहेत. तसेच हे दोन्ही नेते कधीही एकमेकांच्या विरोधी भूमिका घेतांनाही दिसून आले नाही. अगदी पक्षीय पातळीवर देखिल यांनी कधीही राजकीय वैरभाव जोपसला नाही.

शिवसैनिकांची गोची

राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप बघता मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना भाजपासह विरोधकांवर तुटून पडण्याचे आदेश दिले. आता राज्यात या आदेशाची अंमलबजावणी होणार असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या यारीमुळे शिवसैनिकांची चांगलीच गोची झाली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार भाजपावर तुटून पडणार कसे? असा प्रश्न शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.

दुश्मन का दुश्मन अपना दोस्त

जळगावातील हेवीवेट नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला असला तरी भाजपासह सत्तेतील सहकारी मित्र पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्याची संधी ते कधीही दवडत नाही. त्यामुळे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखिल भाजपाच्या गिरीश महाजनांसोबत राजकीय सलोख्याचे संबंध टिकवून आहेत. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील विरूध्द एकनाथराव खडसे असा सामना जिल्ह्यासाठी आता काही नवीन राहिलेला नाही. त्यामुळे ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त (‘Enemy of the enemy is your friend’)’ याची प्रचिती जळगावातील या नेत्यांमध्ये दिसून येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com