माजी मंत्री गुलाबराव देवकरांना तात्पुरता दिलासा

शिक्षेची स्थगिती उठविण्याच्या याचिकेवर 22 रोजी सुनावणी
माजी मंत्री गुलाबराव देवकरांना तात्पुरता दिलासा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या (Jalgaon Municipality) घरकुल (Gharkul scam case) घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर (Former Minister Gulabrao Deokar) यांच्या शिक्षेला स्थगिती (Postponement of sentence) देण्यात आली होती. शिक्षेची स्थगिती उठवावी (moratorium should be lifted) यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी कामकाज होते. दरम्यान, व्दि न्यायपीठापैकी एक न्यायपीठ नसल्यामुळे पुढील तारीख देण्यात आली असून, आता, 22 नोव्हेंबर रोजी कामकाज होणार आहे. त्यामुळे देवकरांना तात्पुरता दिलासा (Comfort) मिळाला आहे.

घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली होती. देवकरांच्या शिक्षेवरील स्थगिती उठवावी यासाठी पवन ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेवून याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी कामकाज होणार होते. मात्र, पुढची तारीख देण्यात आली असून, दि. 22 नोव्हेंबर रोजी कामकाज होईल.

जळगाव जिल्हा बँकेची दि. 21 रोजी निवडणूक आहे. जिल्हा बँकेसाठी देवकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, शिक्षेवरील स्थगिती उठविण्याच्या याचिकेवर 22 रोजी कामकाज होणार असल्याने तुर्तास देवकरांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com