मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात

मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव - jalgaon

अमळनेर शहर तलाठी गणेश राजाराम महाजन (वय ४६) व मंडल अधिकारी दिनेश शामराव सोनवणे (वय ४८) या दोघांना मसीबीच्या पथकाने सापळा रचत दिड लाख रूपयांची लाच स्विकारताना आज दि.१३ रोजी ताब्यात घेतले.

मंडल अधिकारी व तलाठी या दोघं महसूल कर्मचारी यांनी दोन लाख रूपये लाच मागीतली यात तडजोड करत दिड लाख रू. घेताना जाळ्यात सापडले.

तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000 रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000 रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली असता दोघं संशयीतांना अटक केली.

ही कारवाई DYSP शशिकांत एस.पाटील, PI संजोग बच्छाव, PI एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com